शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

पाचशे रुपयांची लाच स्विकारताना पोलीस सापडला पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 10:07 PM

ही कारवाई आज गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली.

गोंदिया - राज्य राखीव पोलीस गट क्रमांक १ पुणे येथील शिपायाला ५०० रुपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक फौजदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई आज (दि.३) गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. प्रभाकर अनंत अंडागडे असे  पाचशे रुपयांची लाच स्विकारणाऱ्या सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार पुणे येथील राज्य राखीव दल गट क्रमांक १ ची तुकडी गोंदियाच्या नक्षलग्रस्त भागात आली. २२ जून रोजी ते पोलीस मुख्यालय गोंदिया येथे हजर झाले. नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर जाण्यापूर्वी त्यांचे कमांडो प्रशिक्षण पोलीस मुख्यालय गोंदिया येथे सुरु आहे. प्रशिक्षणा दरम्यान सहाय्यक फौजदार पी.ए.अंडागडे याने २७ जून रोजी कंपनीच्या ४० कर्मचाऱ्यांनी सांगितले की, गोंदिया जिल्ह्यात आपली ड्युटी लागल्यामुळे वेतनामध्ये प्रोत्साहन भत्याचा फायदा होतो आणि सुट्टीवर येणे-जाणे सोईस्कर होते. त्यामुळे विकास पाटील यांनी प्रयत्न करुन आपल्या कंपनीची ड्युटी गोंदिया जिल्ह्यात लावून घेतली असे सांगितले. त्यामुळे आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून २० हजार रुपये गोळा करुन तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना पाठवायचे आहेत असे सांगून प्रत्येकाकडून ५०० रुपयांची लाच मागण्यात आली. परंतु एका शिपायाला ते ५०० रुपये देण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे त्याने २९ जून रोजी पी.ए.अंडागडे यांच्याविरुद्ध तक्रार केली. यासंदर्भात ३ जुलै रोजी सापळा रचून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक फौजदाराला अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,राजेश दुदलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे,पोलीस निरीक्षक शशीकांत पाटील, हवालदार प्रदीप तुळसकर,राजेश शेंद्रे, नायक पोलीस शिपाई रंजीत बिसेन, दिगंबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, वंदना बिसेन, गीता खोब्रागडे, देवानंद मारबते यांनी केली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसArrestअटक