जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:39 IST2025-07-31T08:38:17+5:302025-07-31T08:39:21+5:30
पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. त्यात एका फुटेजमध्ये रात्री १ च्या सुमारास संशयित दुचाकी दिसली

जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग...
नवी दिल्ली - २८ जुलैला गाजियाबाद इथल्या नाल्यात सापडलेल्या महिलेच्या मृत्यूचे रहस्य पोलिसांनी उलगडलं आहे. ही महिला दिल्लीत राहणारी होती. तिच्या मित्रानेच तिची क्रूर हत्या केल्याचं समोर आले. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २८ जुलैला सैन विहार परिसरात एका नाल्यात महिलेचा मृतदेह सापडला होता. स्थानिकांनी माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोहचली. एका चादरीत हा मृतदेह गुंडाळला होता. खूप प्रयत्नानंतरही या मृत महिलेची ओळख पोलिसांना पटली नाही. त्यानंतर मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला. या महिलेची २ दिवसापूर्वी हत्या झाली असून तिच्या डोक्यावर एका अवजड वस्तूने वार केल्याचे रिपोर्टमधून कळले. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. महिलेची ओळख पटल्याशिवाय तिची हत्या करणारा गुन्हेगार शोधणे पोलिसांसमोर आव्हान होते.
पोलिसांनी मृतदेह सापडलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. त्यात एका फुटेजमध्ये रात्री १ च्या सुमारास संशयित दुचाकी दिसली. त्यातून माणसाची ओळख पटवता आली नाही परंतु दुचाकीचा मार्ग आणि आणखी सीसीटीव्ही तपासले असता पोलीस आरोपीपर्यंत पोहचली. हा आरोपी सैन विहार परिसरातील मोहम्मद उर्फ राजू हा होता. राजूची पोलीस चौकशी केली असता ही महिला दिल्लीत राहणारी असून ती सेक्स वर्कर होती असं उघड झाले.
४ वर्षांनी पुन्हा भेटली, अन्...
अनेक वर्षापासून राजू आणि मृत महिलेची मैत्री होती. दोघेही एकमेकांच्या घरी येत-जात होते. परंतु मध्यंतरी दोघांमधील संपर्क तुटला. ४ वर्षांनी महिला आणि राजूची पुन्हा भेट झाली. त्यानंतर पुन्हा दोघे जवळ आले. एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू झाले. २६ जुलैला महिला राजूच्या घरी गेली होती. तिने राजूकडे सोबत राहण्याचा हट्ट धरला. जेव्हा ही महिला राजूच्या घरी पोहचली तेव्हा तिने सोन्याचे दागिने घातले होते. राजूची नजर त्या दागिन्यांवर पडली. महिलेसोबत कुणी नसते हे त्याला माहिती असल्याने त्याने दागिने हडप करण्याचा डाव रचला. ही महिला झोपलेली असताना राजूने तिच्या डोक्यात वीट घालून तिला ठेचून मारले. घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. हत्येनंतर राजूने तिचा मृतदेह दुचाकीवर घेऊन जात हायवेशेजारी असलेल्या नाल्यात फेकून दिला अशी कबुली आरोपीने पोलीस चौकशीत दिली. पोलिसांनी आरोपीकडून दुचाकी, हत्येसाठी वापरलेली वीट, ३९ हजार रुपये आणि दागिने जप्त केले आहेत.