शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

फॅशन डिझाइनर महिलेचा कारनामा; श्रीमंतांची मैत्री, प्रेमाचं नाटक, लॉजवर भेटायला बोलवायची, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:18 IST

इतक्यावरच न थांबता दीपा पीडित व्यक्तीला फोन करत होती. या पुरुषांकडून ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायची.

बंगळुरू - कर्नाटकच्या बेळगावी पोलिसांनी एका फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. या महिलेने सोशल मीडियाला तिचे शस्त्र बनवले होते. श्रीमंत मुलांशी मैत्री करायची, त्यांना लॉजवर भेटायला बोलवायची आणि त्यानंतर चलाखीने त्यांच्याकडून पैसे, सोने आणि वाहने घेऊन फरार व्हायची. या महिलेने बऱ्याच पुरुषांना तिच्या जाळ्यात ओढून अशीच फसवणूक केली आहे. या प्रकरणात अनेक खुलासे तपासात उघड होत आहेत. 

हनीट्रॅप फ्रॉडने पोलिसांना हैराण केले आहे. या प्रकरणी ३३ वर्षीय महिला दीपा अवतागी हिला पोलिसांनी अटक केली. ती बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूरची राहणारी असून व्यवसायाने फॅशन डिझाईनर आहे. माहितीनुसार, ही महिला इन्स्टाग्राम आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करून हायप्रोफाईल पुरुषांना टार्गेट करत होती. आधी मैत्री करून हळूहळू विश्वास संपादन करायची. त्यानंतर त्याचा फायदा घेऊन ती त्या पुरुषांची आर्थिक फसवणूक करत होती. दीपा अशा पुरुषांना फसवायची ज्यांची आर्थिक स्थिती चांगली असेल. 

सोशल मीडियावर दीपा आधी त्या पुरुषाला मेसेज पाठवायची. त्यानंतर त्याच्याशी बोलायची. दोघांमध्ये संवाद सुरू झाल्यावर समोरच्याला विश्वासात घेत होती. या दोघांमधील जवळीक वाढली तर दीपा त्या व्यक्तीला भेटायला बोलवत होती. कुठल्याही तरी लॉज अथवा हॉटेलमध्ये दीपा त्यांना भेटायची. आतापर्यंत तिच्या या जाळ्यात अनेक पुरुष अडकले आहेत. लॉजवर बोलवल्यावर दीपा काही तरी बहाणा बनवून पीडिताला बाथरूमला पाठवायची. जसे तो व्यक्ती बाथरूमला जायचा तेव्हा संधीचा फायदा घेत ती पैसे, रोकड, सोने आणि बॅग असं सामान घेऊन फरार व्हायची. काही घटनांमध्ये तिने पीडित व्यक्तीची कारही पळवली आहे. 

दरम्यान, इतक्यावरच न थांबता दीपा पीडित व्यक्तीला फोन करत होती. या पुरुषांकडून ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायची. जर पैसे दिले तर तुझे सामान परत करेन असं ती म्हणत होती. मात्र त्यानंतर पुन्हा पैसे लुटण्याचा डाव रचायची. अनेक पीडित पुरुषांनी बदनामीच्या भीतीने त्यांच्यासोबत घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही. जर पीडित व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला तर खोट्या पोलीस प्रकरणात त्याला अडकवण्याची धमकी दिली जात होती. या भीतीतून पीडितांनी पोलिसांनाही हा प्रकार सांगितला नाही. अखेर एका तक्रारीवरून या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दीपा अवतागी हिला अटक केली असून तिच्या काळ्या कारनाम्याची माहिती समोर आणली जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fashion designer honey traps rich men, loots them: Police

Web Summary : A fashion designer in Karnataka lured wealthy men via social media. She'd meet them at lodges, then steal their valuables and vehicles, blackmailing them for more money. Police arrested her after a complaint revealed her scheme.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhoneytrapहनीट्रॅप