पीडित मुलीच्या घरासमोर फटाके फोडणाऱ्यांची पाेलिसांनी काढली धिंड; आराेपीचा जामीन रद्द करण्याकरिता अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 09:40 IST2025-07-24T09:39:36+5:302025-07-24T09:40:09+5:30
पीडितेच्या घरासमोर ढोल-ताशे वाजवत मिरवणूक काढून आतषबाजी करणाऱ्या गुंडांची रमाबाई आंबेडकरनगर परिसरातून बुधवारी दुपारी पोलिसांनी त्यांची धिंड काढली.

पीडित मुलीच्या घरासमोर फटाके फोडणाऱ्यांची पाेलिसांनी काढली धिंड; आराेपीचा जामीन रद्द करण्याकरिता अर्ज
उल्हासनगर : पीडितेच्या घरासमोर ढोल-ताशे वाजवत मिरवणूक काढून आतषबाजी करणाऱ्या गुंडांची रमाबाई आंबेडकरनगर परिसरातून बुधवारी दुपारी पोलिसांनी त्यांची धिंड काढली. तसेच त्यांचे जामीन रद्द करण्यासाठी ठाणे न्यायालयात सहायक सरकारी अभियोक्त्यांकडे अहवाल सादर केल्याची माहिती उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली. १७ जुलै रोजी रोहित झा, आशिष झा यांनी पीडितेच्या घरासमोर मिरवणूक काढून आतषबाजी करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला हाेता.
दोन्ही गटांत समझोता
आरोपी रोहित झा व इतरांच्या जामीन सुनावणीदरम्यान फिर्यादी व साक्षीदार यांनी लेखी ना हरकत दिल्यामुळेच त्यांना जामीन मिळाला, अशी माहिती गोरे यांनी दिली, तसेच फिर्यादी मुलीची आजी आजारी असल्याने ती उत्तर प्रदेश येथील मूळगावी गेल्याचे सांगितले.
घटनास्थळीच कारवाई
मिरवणूक व फटाक्यांची आतषबाजी करणारा आरोपी संजय सुरडकर, तसेच दिवाकर यादव यांना पोलिसांनी अटक करून गुन्हा घडला त्या घटनास्थळी नेऊन त्यांची धिंड काढली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला होता.