शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याचं म्हणत लुटणाऱ्या भामट्याला अटक; रतन टाटांशी संबंध असल्याचा करत होता दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 23:58 IST

Facke Cop Arrested : आरोपीनं तयार केलं होतं पोलिसांचं ओळखपत्र. वसई पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्देआरोपीनं तयार केलं होतं पोलिसांचं ओळखपत्रवसई पोलिसांनी केली अटक

पोलीस असल्याचं सांगत लोकांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला वसई येथील माणिकपूर पोलिसांनी गजाआड केलं. पोलीस असल्याचं सांगत त्या व्यक्तीनं काही लोकांची फसवणूक केली होती, तर अनेकांना लुटण्यासारखे प्रकारही त्यानं केले होते. इतकंच काय तर आपल्या परिचयाच्या असलेल्या एका मैत्रिणीलाही त्यानं लुटलं होतं. त्यानंतर त्या महिलेनं यासंदर्भात तक्रार केली. यावर कारवाई करत वसईतील माणिकपूर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे.पोरस जोखी असं या आरोपीचं नाव असून तो महानगरपालिकेचाही कॉन्ट्रॅक्टर आहे. आपल्याला महानगरपालिकेचं मोठं कंत्राट मिळालं असून त्यात गुंतवणूक करण्यासही त्यानं अनेकांना सांगितलं. तसंच यानंतर दुप्पट रक्कम परत करण्याचंही त्यानं आमिष दाखवलं. परंतु काही दिवसांनी लोकांनी आपली रक्कम मागितल्यानंतर त्यानं आपण पोलीस असल्याचं सांगत धमकावण्याचे प्रकार केले. परंतु यानंतर काही जणांनी त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. दरम्यान, पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक आहे. त्यानं पोलिसांत असल्याचं भासवण्यासाठी बनावट ओळखपत्रही तयार करून घेतलं होतं. याशिवाय स्थानक आमदार आणि उद्योगपती रतन टाटा यांच्याशीही आपले चांगले संबंध असल्याचं त्यानं अनेकांना सांगितलं होतं. सध्या पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रRatan Tataरतन टाटाfraudधोकेबाजी