प्रेमात अडकवलं, नमाज पठण केले, इस्लाम शिकवणीसाठी ट्यूशन लावले; एका अटीने पोलखोल झाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:14 IST2024-12-19T14:14:04+5:302024-12-19T14:14:30+5:30
महिलेच्या वडिलांनी आता फराजवर गंभीर आरोप केले आहेत.

प्रेमात अडकवलं, नमाज पठण केले, इस्लाम शिकवणीसाठी ट्यूशन लावले; एका अटीने पोलखोल झाली
नवी दिल्ली - "अंकलजी, माझं नाव फराज, मी तुमच्या मुलीवर खूप प्रेम करतो. जर तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी दिली तर मी वचन देतो, तुमच्या मुलीची आयुष्यभर काळजी घेईन. तिला काहीच कमी पडू देणार नाही.." हॉस्पिटलच्या आयसीयू बेडवर उपचार घेणाऱ्या कॅन्सर पीडित व्यक्तीने जेव्हा त्यांच्या मुलीसोबत असलेल्या मुलाला पाहिले तेव्हा इच्छा नसतानाही त्यांनी दोघांच्या नात्याला होकार दिला. मनात एक भीती होती परंतु मुलीच्या आनंदापुढे आणि हट्टापायी त्यांना काहीच विरोध करता आला नाही.
वडिलांनी होकार दिल्यानंतर फराजने त्यांच्या मुलीने लिहिलेली चिठ्ठी व्यक्तीच्या हातात ठेवली आणि सही करायला सांगितली. त्यासोबतच जोपर्यंत दोघांचे लग्न होत नाही तोवर कुठल्याही नातेवाईक, मित्रांना या नात्याचा उल्लेख करू नका अशी विनंती केली. वडिलांनी मुलीसाठी ही अटही मान्य केली परंतु काही दिवसानंतर फराजचे सत्य बाहेर आले तेव्हा त्यांना धक्काच बसला. अंगावर काटा आणणारी ही घटना राजधानी दिल्लीला लागून असलेल्या यूपीच्या गाझियाबाद इथली आहे.
११ डिसेंबरला याठिकाणी ३० वर्षीय एका महिलेने स्वत:च्या अंगावर केरोसिन टाकून आग लावली. ही तीच महिला होती जिचा हात मागण्यासाठी फराज हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या तिच्या वडिलांकडे पोहचला होता. महिलेच्या वडिलांनी आता फराजवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलीला लव्ह जिहादमध्ये फसवून तिच्यावर खोटे प्रेम केले. त्यानंतर तिचा छळ करून जीव देण्यासाठी मजबूर केले असा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला. अखेर या महिलेने जीव का दिला, फराजशी तिची ओळख कधी आणि कुठे झाली? त्या चिठ्ठीत काय लिहिलं होते, ज्यावर फारजने वृद्ध वडिलांची सही घेतली. फराजने तिच्या वडिलांना नात्याबाबत कुणाला सांगू नका अशी विनवणी का केली होती यासारखे अनेक प्रश्न उभे राहिले.
लव्ह, सेक्स अन् धोका
या कहाणीची सुरुवात काही वर्षापूर्वी झाली जेव्हा गाझियाबाद येथे राहणारी युवती दिल्लीला आली होती. तिथे फराज अतहर नावाच्या युवकाशी तिची ओळख झाली. दोघांमध्ये प्रेम प्रकरण झाले, त्यानंतर भेटीगाठी वाढल्या. त्यातच युवतीच्या नावावर तिच्या वडिलांनी २० कोटींची संपत्ती केल्याचं फराजला कळले. आता ही संपत्ती हडपण्यासाठी फराजने प्लॅन रचला. फराजने युवतीला ड्रग्सचं व्यसन लावले. जेव्हा ती ड्रग्स घ्यायची तेव्हा नशेत फराज तिचं लैंगिक शोषण करत होता. त्यातून ती गर्भवती राहिली परंतु फराजने तिला फसवून गर्भपात करायला भाग पाडले.
फराज युवतीला जाळ्यात अडकवून तिच्याकडून पैसे लुटायचा. जवळपात ६.५० लाखाहून अधिक रक्कम फराजने तिच्याकडून घेतली होती. मात्र कहाणीत ट्विस्ट आला. फराजने युवतीवर मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव बनवला. त्यासाठी तिला काही मुस्लीम समाजाच्या व्हॉट्सअपवर जोडले, तिला वाचनासाठी धार्मिक पुस्तके आणि नमाज कशी वाचायची हे शिकवण्यासाठी मुस्लीम मौलानाकडे ट्यूशन लावले. फराजच्या प्रेमात वेडी झालेल्या युवतीने त्याचे सर्व काही ऐकले. ड्रग्सच्या नादात तिने गर्भपातही केला. इस्लाम धर्म स्वीकारायला तयार झाली. दरवाजा बंद करून घरात नमान पठण करत होती. एकेदिवशी युवतीच्या वडिलांना तिच्यावर संशय आला.
युवतीमधला हा बदल पाहून वडील संतापले. त्यांनी एकेदिवशी हळूच रूमचा दरवाजा उघडला तेव्हा मुलगी नमाज पठण करत असल्याचं दिसले. हे पाहून वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांची तब्येत ढासळली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावे लागले. दुसऱ्याच दिवशी फराजला घेऊन युवती हॉस्पिटलला पोहचली आणि लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मुलीच्या हट्टापायी वडिलांनाही जास्त काळ विरोध करता आला नाही. फराजने ज्या चिठ्ठीवर युवतीच्या वडिलांची सही घेतली त्यात मी माझ्या मर्जीने मुलीचे लग्न फराजशी करत असून भविष्यात मला या लग्नावर कुठलाही आक्षेप नाही असं लिहिलं होते.
लग्नासाठी ठेवली अट
२४ नोव्हेंबरला फराजने युवतीसह तिच्या वडिलांना गाझियाबादला आणले, तिथे फराजचं कुटुंब उपस्थित होते. फराजने पुन्हा युवती आणि तिच्या वडिलांना वचन दिले. येणाऱ्या ५ डिसेंबरला कोर्टात लग्न करायचे ठरले पण याचवेळी फराजने युवतीसमोर अट ठेवली. लग्नाआधी तुझ्या वाट्याची सगळी संपत्ती माझ्या नावावर कर, मगच लग्न करू. युवतीने ही गोष्ट १० डिसेंबरला तिच्या वडिलांना सांगितली. युवतीच्या प्रेम भावनेशी खेळून फराजने ऐनवेळी लग्नासाठी ठेवलेली अट ऐकून युवती वैफल्यग्रस्त झाली.
दरम्यान, वृद्ध पिता काही करायच्या आत ११ डिसेंबरला युवतीने घरात स्वत:वर केरोसिन टाकून आग लावली. आता हे प्रकरण पोलीस स्टेशनला पोहचले आहे. फराजने मुलीवर धर्मांतरासाठी दबाव आणला होता. मृत्यूपूर्वी युवतीने फराजला १२० कॉल केले परंतु त्याने एकदाही फोन उचलला नाही. युवतीने तिच्यावर घडलेले प्रसंग मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आणि जीव दिला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी युवतीच्या घरातून फराजशी संबंधित धार्मिक साहित्य आणि इतर गोष्टी जप्त केल्या. ज्यातून फराजचा युवतीवर दबाव होता हे स्पष्ट होत आहे.