पनवेलमध्ये कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांची कारवाई; शस्त्रासह एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 21:42 IST2019-03-22T21:38:39+5:302019-03-22T21:42:45+5:30
पोलिसांनी म्हसकरला अटक केली आहे.

पनवेलमध्ये कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिसांची कारवाई; शस्त्रासह एकास अटक
पनवेल : तालुका पोलिसांनी घातक शस्त्रे बाळगणाऱ्यास अटक केली असून त्याच्याकडून लोखंडी तलवार, भाले, कोयते जप्त करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांना नारपोली येथील गणोश हिरू म्हसकर (53) याच्या घरात विनापरवाना तलवार, चॉपर व इतर प्रतिबंधित हत्यारे बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वपोनि अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश जाधव, सपोनि विजय खेडकर व त्यांच्या पथकाला घरात घेतलेल्या झडतीत 2 भाले, 1 तलवार, 5 कोयते सापडले. पोलिसांनी म्हसकरला अटक केली आहे.
नवी मुंबई - पनवेलमध्ये कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान दोन भाले, 1 तलवार, पाच कोयते सापडले, तसेच मद्यसाठाही जप्त https://t.co/fUWIufX59Ypic.twitter.com/VfUP6PKKsy
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) March 22, 2019