उल्हासनगरात नशेखोराकडून पोलिसाला शिवीगाळ
By सदानंद नाईक | Updated: March 4, 2023 18:01 IST2023-03-04T18:01:07+5:302023-03-04T18:01:14+5:30
याप्रकरणी पोलिसांनी नशेखोर विष्णुसिंग परिहार विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगरात नशेखोराकडून पोलिसाला शिवीगाळ
उल्हासनगर : कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन येथील सार्वजनिक रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या नशेखोरला पोलिसांनी अटकाव करताच शिविगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी नशेखोर विष्णुसिंग परिहार विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर फॉरवर्ड चौक परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर शुक्रवारी रात्रीत १० वाजण्याच्या दरम्यान नशेत विष्णुसिंग राजेंद्र परिहार याने आरडाओरडा करून धिंगाणा घातला. याबाबत पोलिसांनी अटक करून तपासणीसाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता रुग्णालयात धिंगाणा घालून पोलिसांना शिवीगाळ केली. त्यानंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या अंमलदार कक्षात परिहार याने धिंगाणा घालून पोलिसांना शिवीगाळ करून धमकी दिली. अखेर पोलिसांनी नशेखोर विष्णुसिंग परिहार याच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. याप्रकरणीं पोलीस अधिक चौकशी करण्यात येत आहे.