BREAKING : PNB Scam : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; युकेच्या गृहमंत्र्यांनी दिली मंजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 05:54 PM2021-04-16T17:54:42+5:302021-04-16T17:57:01+5:30

PNB Scam : याबाबत माहिती देताना सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, युकेच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणास मान्यता दिली आहे.

PNB Scam: Clear the way for Nirav Modi's extradition; Approved by the UK Home Office | BREAKING : PNB Scam : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; युकेच्या गृहमंत्र्यांनी दिली मंजुरी 

BREAKING : PNB Scam : नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; युकेच्या गृहमंत्र्यांनी दिली मंजुरी 

Next
ठळक मुद्देपंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १३ हजार ६०० कोटी रुपयांचा घाेटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात पाठवले जाईल, हे अलीकडेच नक्की झाले होते.

१३ हजार ६०० कोटी रुपयांचा घाेटाळा करून फरार झालेला नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत माहिती देताना सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले की, युकेच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणास मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच नीरव मोदी भारताच्या ताब्यात येणार आहे. 

नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याबाबत लंडनच्या वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने 25 फेब्रुवारी रोजी निर्णय दिला होता. या निर्णयानंतर नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याचा मार्ग कोर्टाने मोकळा केला होता. त्यानुसार आता आज युनायटेड किंगडमच्या गृहमंत्र्यांनी नीरव मोदीला भारताकडे सुपूर्द करण्याला मंजूरी दिली आहे. याबाबतची माहिती भारतातील CBI च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पंजाब नॅशनल बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने तब्बल १३ हजार ६०० कोटी रुपयांचा घाेटाळा करून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात पाठवले जाईल, हे अलीकडेच नक्की झाले होते. ब्रिटनच्या न्यायालयामध्ये प्रत्यार्पण खटल्यात मोदींच्या हाती अपयश आले होते. त्याच्यावरील आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपात तथ्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले होते. 

PNB Scam: "तुझ्यासाठी मुंबईचा तुरुंगच योग्य", लंडनमधील कोर्टाने दिले नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश

आरोपात तथ्य असल्यामुळेच नीरव मोदीला भारतातील न्यायालयाचे दार ठोठावे लागेल, असे ब्रिटनच्या न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते. त्याने साक्षीदारांना धमकावण्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असेही न्यायालयाने म्हटले होते. खटल्याचा निकाल सुनावण्यात आला, तेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नीरव माेदी उपस्थित होता. पण निकालानंतरही तो अतिशय निर्विकार होता. निकाल ऐकून त्याच्या चेहऱ्यावरील रेखही हलली नाही. जिल्हा न्यायाधीश सॅम्युएल गुझी यांनी निकालाचा काही भाग न्यायालयात वाचून दाखविला होता. ते म्हणाले होते की, आपण पूर्ण निकालपत्र गृहमंत्र्यांकडे (सेक्रेटरी ऑफ स्टेट) पाठवत आहोत. 

आर्थर रोड तुरुंगात

नीरव मोदी याच्यासाठी आर्थर रोड तुरुंगातील १२ क्रमांकाची बराक ही योग्य जागा आहे, तिथे त्याच्या तब्येतीची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि आत्महत्या करण्यास तिथे वावही नसेल, असेही  न्यायालयाने म्हटले होते.

 

 

 

Read in English

Web Title: PNB Scam: Clear the way for Nirav Modi's extradition; Approved by the UK Home Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.