शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पीएमपी प्रवाशांचे दागिने व मोबाइल चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 19:15 IST

गेल्या काही दिवसांपासून पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

ठळक मुद्देआत्तापर्यंत दागिने आणि मोबाइल असा १ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त

पुणे : पीएमपी प्रवाशांचे दागिने आणि मोबाइल लांबविणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने पकडले.त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोबाइल असा १ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मंगेश बाळू जाधव (वय २५, रा. पापडे वस्ती, हडपसर), उमेश राजू बिडलान (वय २३,रा. सय्यदनगर, हडपसर), शिवाजी विजय गौड (वय २१,रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. गेल्या काही दिवसांपासून पीएमपी प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गर्दीच्या बसमध्ये प्रवास करून महिला प्रवाशांच्या पिशवीतील दागिने लांबविण्याच्या घटना घडल्या होत्या. गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून चोरट्यांचा माग काढण्यात येत होता.ताडीवाला रस्ता भागात काहीजण चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार दिनेश गडांकुश यांना मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ताडीवाला रस्ता भागात सापळा लावून जाधव, बिडलान, गौड यांना पकडले. चौकशीत त्यांनी पीएमपी प्रवाशांकडील दागिने लांबविल्याची कबुली दिली. चोरट्यांनी पाच गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जाधव या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून आत्तापर्यंत दागिने आणि मोबाइल असा १ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, सहाय्यक निरीक्षक जयवंत जाधव, गडांकुश, अस्लम पठाण, अजय खराडे, किशोर वग्गू, विशाल भिलारे, अजित फरांदे, चंद्रकांत महाजन, कादिर शेख, गोपाळ मदने आदींनी ही कारवाई केली. --

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलjewelleryदागिनेtheftचोरीPoliceपोलिस