संतापजनक! ‘अल्लाह’ला कुर्बानी देण्यासाठी निर्दयी आईनं स्वत:च्या मुलाचा गळा चिरला, त्यानंतर...

By प्रविण मरगळे | Updated: February 8, 2021 10:41 IST2021-02-08T10:39:58+5:302021-02-08T10:41:47+5:30

या निर्दयी आईने ज्या मुलाची हत्या केली तो ३ मुलांपैकी सर्वात छोटा मुलगा होता, या महिलेचं वय ३० वर्ष आहे.

To please ‘Allah’, pregnant madrasa teacher in Kerala slits 6-year-old son’s throat | संतापजनक! ‘अल्लाह’ला कुर्बानी देण्यासाठी निर्दयी आईनं स्वत:च्या मुलाचा गळा चिरला, त्यानंतर...

संतापजनक! ‘अल्लाह’ला कुर्बानी देण्यासाठी निर्दयी आईनं स्वत:च्या मुलाचा गळा चिरला, त्यानंतर...

ठळक मुद्देया महिलेच्या अंधविश्वासाला पाहून तिच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना रविवारी पहाटे ४ वाजता घडली, चिमुकला मुलगा आईसोबत बेडवर झोपला होतामुलाची हत्या करून आरोपी महिलेने स्वत: पोलीस आणि तिच्या नातेवाईकांना फोन करून याची माहिती दिली

पलक्कड – केरळच्या पलक्कड जिल्ह्यात एक ह्दयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी मदरसामधील महिला शिक्षिकेने स्वत:च्या ६ वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरून त्याची हत्या केली आहे. अल्लाहला खूश करण्यासाठी मुलाचा बळी दिला असल्याचं महिलेने सांगितले. या संतापजनक घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. इतकचं नाही तर आरोपी महिला गरोदर असल्याचीही माहिती आहे.

या निर्दयी आईने ज्या मुलाची हत्या केली तो ३ मुलांपैकी सर्वात छोटा मुलगा होता, या महिलेचं वय ३० वर्ष आहे. ६ वर्षीय मुलाची हत्या करून आरोपी महिलेने स्वत: पोलीस आणि तिच्या नातेवाईकांना फोन करून याची माहिती दिली. आरोपी मदरसा शिक्षिकेने सांगितले की, मी माझ्या मुलाची कुर्बानी अल्लाहसाठी दिली आहे. या महिलेच्या अंधविश्वासाला पाहून तिच्या नातेवाईकांना आणि पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. एक महिला स्वत:च्या मुलाला कसं मारू शकते असा प्रश्न सगळ्यांच्या मनात पडला आहे. आरोपी महिलेच्या कबुलीजबाबानंतर तिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या महिलेविरोधात हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.

काय घडली होती घटना?

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना रविवारी पहाटे ४ वाजता घडली, चिमुकला मुलगा आईसोबत बेडवर झोपला होता, तेव्हा आईने मुलाला उठवून बाथरूमला घेऊन गेली, त्याठिकाणी मुलाचे हातपाय बांधले, त्यानंतर या निर्दयी आईने स्वत:च्या मुलाचा गळा चिरला, यावेळी मुलगा तडफडत होता तरीही आईला दया आली नाही. घटनेच्यावेळी आरोपी महिलेची दोन्ही मुलं वडिलांसोबत दुसऱ्या रुममध्ये झोपले होते, आरोपी महिलेचा पती काही दिवसांपूर्वीच परदेशातून भारतात परतला होता.

मदरसा शिक्षिकेविरोधात कडक कारवाई

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या आरोपी महिलेने स्वत: फोन करून मुलाची हत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी तातडीनं पोलीस पोहचले, परिस्थितीचा आढावा घेतला आणि आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेवर कडक कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितले. मात्र या घटनेमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Read in English

Web Title: To please ‘Allah’, pregnant madrasa teacher in Kerala slits 6-year-old son’s throat