ठाणे - रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 5 वर पडलेल्या प्लास्टिक पिशवी सापडली आहे. या पिशवीत 2 लाख़ 38 हजार इतके रुपये होते. ही पैश्यांची पिशवी शहापूर येथील विजय मोरे यांनी प्रामाणिकपणा दाखवून ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात जमा केले आहेत. ही घटना सोमवारी घडली असून पैसे हरवल्याची अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी दिली. सर्व नोटा दोन हजार रूपयांच्या असून त्या कागदामध्ये गुंडाळून ठेवल्या होत्या. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणत्याही प्रवाशाची पैश्यांची पिशवी हरवलेली असल्यास त्यांनी ठाणे रेल्वेपोलिसांना संपर्क साधावा.
ठाण्यात रेल्वे स्थानकात २ हजार रुपयांच्या नाेटा असलेली प्लास्टिक पिशवी सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 16:03 IST