शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोट प्रकरणः प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
3
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
5
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
6
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
7
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
8
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
9
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
10
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
11
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
12
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
13
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
14
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
15
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
16
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
17
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
18
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
19
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
20
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!

अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी

By नारायण बडगुजर | Updated: June 12, 2025 22:04 IST

पिंपरी-चिंचवड पोलिस न्यायालयात सादर करणार पुरवणी आरोपपत्र  

- नारायण बडगुजर

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील १७ वर्षीय कबड्डीपटू युवतीवर अत्याचार प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयितांना जेरबंद केले. याप्रकरणी पोलिसांकडून न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे.  

अंकुश बबन भेंडेकर (वय २४), शिवाजी निवृत्ती वाबळे (५५, दोघेही रा. दहिगावणे, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), रमेश शिवाजी गांगर्डे (२६, रा. बहिरोबाची वाडी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. यातील शिवाजी वाबळे आणि रमेश गांगर्डे हे दोघेही क्रीडा प्रशिक्षक असून दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावत तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तर अंकुश भेंडेकर हा जामिनावर आहे. पीडित १७ वर्षीय युवतीच्या मामाने याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलिस ठाण्यात २६ फेब्रुवारी २०२५ रोजी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय युवती राष्ट्रीय कबड्डीपटू आहे. तिला चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी भोसरी येथील संस्थेत सराव सुरू केला. त्यासाठी वाकड येथे तिच्या मामाकडे ती रहायला आली होती. दरम्यान, २५ फेब्रुवारी रोजी ती घरी न परतल्याने तिच्या मामाने वाकड पोलिस ठाण्यात धाव घेतली. अल्पवयीन असल्याने तिचे अपहरण झाल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात २६ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. वाकड पोलिसांनी याप्रकरणी अंकुश याला अटक केली. त्याला जामीन मिळाला आहे. 

दरम्यान, आपल्यावर अत्याचार झाल्याचे पीडित १७ वर्षीय युवतीने सांगितले. त्यानुसार वाकड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये कलम वाढ करण्यात आली. ‘ॲट्राॅसिटी’ आणि बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी कलम वाढ झाली. त्यानंतर वाकडचे सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्याकडे तपास आला. त्यांनी संशयित शिवाजी वाबळे आणि रमेश गांगर्डे यांना अटक केली.   

पिंपरी-चिंचवड पोलिसांची तत्परता

पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच या गंभीर गुन्ह्याचा योग्य दिशेन तपास करून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी यापूर्वी आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. मात्र, नव्याने कलम वाढ केल्यानंतर गुन्ह्यातील तपासाबाबतचे पुरवणी आरोपपत्र सादर करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण...

-पीडित अल्पवयीन युवतीला संशयित क्रीडा प्रशिक्षकाने कबड्डी स्पर्धेत खेळण्यासाठी परदेशात पाठवण्याचे आमिष दाखवून तिला नेवासे येथे नेले. तेथून पुढे नेऊन एका हॉटेलमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला. तिला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला. नंतर शिवाजी वाबळेने तिला भोपाळला नेले. तिथेही अत्याचार केला. पुढे श्रीलंकेतील उर्वरित स्पर्धेसाठी प्रायव्हेट अकॅडमी जॉईन करावी लागेल, असे सांगितले. हा प्रकार २८ ते ३१ जानेवारी या कालावधीत घडला. 

-दरम्यान, संशयित अंकुश भेंडेकर याने २५ फेब्रुवारी रोजी पीडित युवतीला पुण्यातून पैठण त्यानंतर राहुरी येथे नेले. अपहरणप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना वाकड पोलिसांनी याप्रकरणी नेवासा येथून अंकुश भेंडेकर याला अटक केली. तसेच अल्पवयीन युवतीला सुधारगृहात ठेवले. सुधारगृहातून सुटल्यानंतर लैंगिक अत्याचार झाल्याबाबत तिने सांगितले. त्यानुसार तिचा जबाब नोंदवून गुन्ह्यामध्ये कलमवाढ केली.

टॅग्स :MolestationविनयभंगKabaddiकबड्डीCrime Newsगुन्हेगारी