दिल्लीच्या तरुणीचा फोटो, अफवा! मणिपूरमध्ये जमावाकडून दुसऱ्या तरुणीची इज्जत लुटली गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 21:10 IST2023-07-20T21:10:12+5:302023-07-20T21:10:24+5:30
अतिशय भयानक घटना अडीज महिन्यांपूर्वी घडली होती. काल त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

दिल्लीच्या तरुणीचा फोटो, अफवा! मणिपूरमध्ये जमावाकडून दुसऱ्या तरुणीची इज्जत लुटली गेली
अवघ्या देशाला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या मणिपूर हिंसाचारावेळच्या व्हिडीओमागची घटना समोर आली आहे. एखादी अफवा काय करू शकते, कोणत्या थराला जाऊ शकते याचे हे उदाहरण आहे. एका भलत्य़ाच फोटोमुळे मणिपूरमध्ये एका तरुणीची इज्जत लुटली गेली आहे, तिच्यासह घरातील महिलांची नग्न धिंड काढली गेली आणि त्यांच्या घरातील वडील आणि भावाला ठार मारले गेले आहे.
अतिशय भयानक घटना अडीज महिन्यांपूर्वी घडली होती. काल त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दोन समाजांतील आरक्षणाचा वाद भयानक थरावर जाऊन पोहोचला आहे. नग्न धिंड काढण्याच्या घटनेला कारणीभूत दिल्लीतील एका तरुणीचा फोटो ठरला आहे.
हिंसाचार सुरु झाल्यावर काही दिवसांतच मैतेई समाजाच्या महिलेवर बलात्कार झाल्याची अफवा पसरली होती. कुकी समाजाच्या लोकांनी महिलेवर बलात्कार केल्याचा त्यात उल्लेख होता. प्लॅस्टिकमध्ये लपेटलेल्या तरुणीचा मृतदेह त्यात दाखविण्यात आला होता. यामुळे हजार लोकांचा मैतेई समाजाचा जमाव जमला आणि त्यांनी एका गावावर हल्ला केला. त्यांना त्या फेक बलात्काचा बदला घ्यायचा होता. यातून महिलांना नग्न करणे, त्यांची धिंड काढणे आणइ बलात्कार करण्याचा प्रकार घडला आहे.
मग तो फोटो कोणाचा होता...
मैतेई समाजाच्या लोकांनी ज्या फोटोवरून कुकी समाजाच्या तरुणीची इज्जत लुटली तो फोटो दिल्लीचा होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये त्या तरुणीच्या आईवडिलांनी आयुषी चौधरीची हत्या केली होती. हे स्पष्ट होईपर्यंत मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना घडू लागल्या होत्या. याबाबतचे वृत्त द प्रिंटने दिले आहे.