Petrol Tanker Blast: पेट्रोल टँकरला अपघात झाला, लोकांनी गर्दी केली; स्फोटात ४ जणांचा मृत्यू, १८ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2022 08:36 IST2022-10-30T08:35:54+5:302022-10-30T08:36:14+5:30

टँकरला अपघात झाल्यावर लोकांनी त्यातून बाहेर पडणारे पेट्रोल गोळा करण्यासाठी गर्दी केली.

Petrol Tanker Blast Mizoram: Petrol Tanker Crash, People Rush to collect fuel; 4 people died in the explosion, 18 were injured | Petrol Tanker Blast: पेट्रोल टँकरला अपघात झाला, लोकांनी गर्दी केली; स्फोटात ४ जणांचा मृत्यू, १८ जखमी

Petrol Tanker Blast: पेट्रोल टँकरला अपघात झाला, लोकांनी गर्दी केली; स्फोटात ४ जणांचा मृत्यू, १८ जखमी

मिझोरामच्या आयझोलमध्ये शनिवारी भीषण अपघात घडला आहे. पेट्रोल टँकरला आग लागून त्याचा स्फोट झाला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून १८ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनुसार ही घटना राजधानीपासून जवळपास १८ किमीवरील तुइरियाल गावात झाली आहे. 

हा टँकर सायंकाळी चंफाईला इंधन घेऊन जात होता. टँकरला अपघात झाल्यावर लोकांनी त्यातून बाहेर पडणारे पेट्रोल गोळा करण्यासाठी गर्दी केली. यावेळी टँकरला आग लागली आणि स्फोट झाल्याचे आयझोलचे एसपी सी लालरुआ यांनी सांगितले. 

या स्फोटानंतर चार जणांचा जळून मृत्यू झाला तर १८ जण भाजले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल आहे. यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. या स्फोटामुळे एक कार आणि दोन दुचाकींचेही नुकसान झाले आहे. टँकरमध्ये जवळपास 22000 लीटर पेट्रोल होते. 

Web Title: Petrol Tanker Blast Mizoram: Petrol Tanker Crash, People Rush to collect fuel; 4 people died in the explosion, 18 were injured