शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : मतदानानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल
3
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
4
"भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
5
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
6
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
7
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
8
"वडील गेल्यापासून आई गेली १२ वर्ष...", विलासराव देशमुखांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक
9
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
10
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
11
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
12
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
13
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
14
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
15
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
16
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
17
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
19
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
20
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

पायल घोषने मागितली रिचा चढ्ढाची माफी; न्यायालयाकडून मानहानीचा दावा निकाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 3:12 AM

रियाने पायलबरोबरच कमाल खान आणि एका वृत्तवाहिनीविरोधातही मानहानीचा दावा दाखल केला होता.

मुंबई : अभिनेत्री रिचा चढ्ढाबाबत केलेले बदनामीकारक आणि आक्षेपार्ह विधान आपण मागे घेत असून तिची माफी मागत असल्याचे अभिनेत्री पायल घोषने सांगितल्यावर उच्च न्यायालयाने रिचाने पायलविरोधात केलेला मानहानीचा दावा निकाली काढला.

रियाने पायलबरोबरच कमाल खान आणि एका वृत्तवाहिनीविरोधातही मानहानीचा दावा दाखल केला होता. पायलने माफी मागितली असली तरी आपण हा दावा लढणार, असे कमाल खानच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्या. ए. के. मेनन यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने कमाल खान याला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत दाव्यावरील सुनावणी सहा आठवड्यांनी ठेवली.चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर पायल घोषने लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि त्यात रिचावरही आरोप केले. एका वृत्तवाहिनीने व कमाल खानने पायलचे ट्विट शेअर केल्याबद्दल रिचाने पायल, कमाल खान व वृत्तवाहिनीविरोधात मानहानीचा दावा करीत १.१ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली. गेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, पायल व रिचाने आपापसांत हे प्रकरण मिटविण्यासाठी न्यायालयापुढे सहमती दर्शविली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयpayal ghoshपायल घोष