उद्या होणार होते DMसोबत लग्न, त्याआधीच DIGच्या मुलीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 13:45 IST2018-12-09T13:44:41+5:302018-12-09T13:45:48+5:30
माजी पोलीस महासंचालकांच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली आहे. स्निग्धा असे या मुलीचे नाव असून तिचे सोमवारी(दि.10) किशनगंजच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यासोबत लग्न होणार होते.

उद्या होणार होते DMसोबत लग्न, त्याआधीच DIGच्या मुलीने केली आत्महत्या
पटना : माजी पोलीस महासंचालकांच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली आहे. स्निग्धा असे या मुलीचे नाव असून तिचे सोमवारी(दि.10) किशनगंजच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यासोबत लग्न होणार होते. मात्र, लग्नाच्याआधी एक दिवस तिने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
माजी महासंचालक सुधांशु कुमार यांची स्निग्धा मुलगी आहे. येथील उदय गिरी अपार्टमेंटमध्ये सुधांशु कुमार राहतात. असे सांगण्यात येत आहे की, स्निग्धा सकाळी ड्रायव्हरसोबत अपार्टमेंटमध्ये आली होती. त्यानंतर तिने इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच, पुढील तपास पोलीस करत आहेत.
वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनु महाराज यांनी सांगितले की, याप्रकरणी तपास सुरु आहे. 14 व्या मजल्यावर मोबाईल सापडला आहे. सुसाईड नोट सापडली नाही. तसेच, कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे.
Manu Maharaj, SSP Patna: Prima facie it appears to be a case of suicide, we've recovered a mobile. Victim's family is in a state of shock, so we haven't questioned them yet, no suicide note has been found. Further investigation is underway. #Biharpic.twitter.com/p705shoLA3
— ANI (@ANI) December 9, 2018