शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

पाटीपुरा येथे  ‘आलू’ने केले ‘उघड्या’वर चाकूचे सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 22:04 IST

Murder News :खुनाची तिसरी घटना : यवतमाळसह ग्रामीणमध्ये सत्र 

ठळक मुद्देपोलीस तपासात आलू उर्फ समीर खानने उघड्या उर्फ प्रशांत याच्यावर चाकूने वार केल्याचे पुढे आले. 

यवतमाळ : येथील पाटीपुरा भागातील क्रांतिसूर्य चाैकात दुचाकीवर आलेल्या अज्ञात तीन मारेकऱ्यांनी युवकाचा चाकूने भाेसकून खून केला. ही घटना साेमवारी रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. घारफळ, मनपूरनंतर यवतमाळ उपविभागातील हा सलग तिसरा खून  आहे. पोलीस तपासात आलू उर्फ समीर खानने उघड्या उर्फ प्रशांत याच्यावर चाकूने वार केल्याचे पुढे आले. 

उघड्या ऊर्फ प्रशांत अंकुश पाईकराव (३६) रा.  आंबेडकर नगर पाटीपुरा असे मृताचे नाव आहे. उघड्या हा त्याचा मित्र मंगेश गुजाबराव नंदपटेल याच्या साेबत क्रांतिसूर्य चाैकात बसून हाेता. तेवढ्यात एकाच दुचाकीवरून तिघे जण आले़  त्यांनी उघड्याला शिवीगाळ करत त्याच्यावर चाकूने हल्ला केला. जीवाच्या भीतीने मंगेश नंदपटले याने घराकडे धुम ठाेकली. उघड्याला शासकीय रुग्णालयात डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. शहर पाेलिसांनी साेमवारी रात्रीच धरपकड सुरू केली. आलू उर्फ समीर खान जमीर खान याला ताब्यात घेतले.  मंगेश नंदपटले याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. 

पाेलिसांची गस्त घटल्याचा परिणाम पाटीपुरा परिसरात मध्यंतरी सातत्याने खुनाच्या घटना घडत हाेत्या. तेव्हापासून परिसरातील अंतर्गत भागात पाेलिसांची सातत्याने गस्त हाेती़; परंतु गेल्या काही दिवसांपासून ही गस्त बंद आहे. त्यामुळे पाटीपुरा परिसरात चाैकाचाैकामध्ये रात्रीच्यावेळेस गर्दी जमलेली असते़  येथे नशेच्या आहारी असलेले टाेळके शुल्लक कारणावरून वाद घालत थेट धारदार शस्त्राने वार करतात. पाेलिसांनी पूर्वीसारखी गस्त कायम ठेवावी, अशी मागणी हाेत आहे़.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूYavatmalयवतमाळPoliceपोलिसArrestअटक