शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

बोंबला! दिल्लीला जात असलेल्या विमानात प्रवाशाचा धिंगाणा, क्रू मेंबरसोबत भांडताना काढले सर्व कपडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 09:39 IST

फ्लाइटमध्ये प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने एएनआयला सांगितले की, 'सर्वातआधी प्रवाशाने लाइफ जॅकेटवरून क्रू मेंबरसोबत वाद सुरू केला.

बंगळुरूहून दिल्लीला जात असलेल्या एअर एशिया फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने फारच गैरवर्तन केलं आणि विमानात प्रवासादरम्यान क्रू मेंबरसोबत झालेल्या वादानंतर आपले सर्व कपडे काढले. ही घटना मंगळवारी एअर एशियाच्या फ्लाइट नंबर I5-722 मध्ये घडली. 

फ्लाइटमध्ये प्रवास करत असलेल्या एका प्रवाशाने एएनआयला सांगितले की, 'सर्वातआधी प्रवाशाने लाइफ जॅकेटवरून क्रू मेंबरसोबत वाद सुरू केला आणि अपशब्द वापरु लागला होता. त्यानंतर फ्लाइटमध्ये स्टाफने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण अशातच त्याने त्याचे त्याचे कपडे काढणे सुरू केले. एक एक करून त्याने सर्व कपडे काढले आणि तो नग्न झाला. एअर एशिया इंडियाच्या प्रवक्त्यांनी या घटनेला दुरोजा दिला आणि सांगितले की, ६ एप्रिलला बंगळुरूहून नवी दिल्ली येत असलेल्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने गैरवर्तन केलं होतं.

एअर एशियाच्या क्रू मेंबरने फ्लाइटमधील इतर प्रवाशांच्या मदतीने स्थितीवर कंट्रोल मिळवला आणि याची माहिती पायलटला दिली. यानंतर पायलटने हे प्रकरण गंभीरतेने घेत दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलरला संपर्क करून याची माहिती दिली आणि त्यानंतर त्यांना लवकरच लॅंडींगची परवानगी मिळाली. लॅंडींग केल्यावर त्या व्यक्तीला लगेच पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

एअरलाइनच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, 'ही  घटना दिल्ली एअरपोर्टववर लॅंडींग दरम्यान समोर आली आहे. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. एअर एशिया इंडियाने डिसरप्टिव पॅंसेंजर हॅंडलिंग पॉलिसीनुसार विमान आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती कारवाई केली. आम्ही नेहमीच प्रवाशी आणि चालक दलाच्या सुरक्षेसाठी काम केलंय. अशा घटनांची आम्ही निंदा करतो'.

दिल्ली पोलिसांनी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कृत्यासाठी एअरलाइन या प्रवाशाला नो फ्लाय लिस्टमध्ये टाकू शकते. मात्र, घटनेची चौकशी अजून सुरू आहे आणि प्रवाशांशी संबंधित कायद्यानुसार या व्यक्तीवर कारवाई केली जाणार. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीairplaneविमानJara hatkeजरा हटके