शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
2
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
3
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
5
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
6
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
7
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
8
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
9
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
10
शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली
11
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
12
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
13
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
14
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
15
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
16
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
17
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
18
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
20
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!

9 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येच्या प्रकरणात पोपटाने दिली साक्ष; कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 1:23 PM

Agra News: आग्रा येथे 2014 साली महिलेची निर्घृण हत्या झाली होती, त्या प्रकरणात कोर्टाने 9 वर्षानंतर शिक्षा सुनावली आहे. वाचा संपूर्ण कहाणी...

आग्रा : पोपट हा असा पक्षी आहे, जो माणसांप्रमाणे बोलू शकतो आणि त्याची स्मरणशक्तीही अतिशय तीक्ष्ण असते. त्याने एखादी गोष्ट एकदा पाहिली किंवा ऐकली तर तो विसरत नाही. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे नऊ वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाच्या खटल्यात पोपटाच्या साक्षीवरुन आरोपींना गुरुवारी शिक्षा सुनावण्यात आली आहे. नीलम शर्मा नावाच्या महिलेची नऊ वर्षांपूर्वी हत्या झाली होती. त्या प्रकरणात पोपटाच्या साक्षीवरुन न्यायालयाने आता मृत महिलेचा भाच्चा आशुतोष गोस्वामी आणि त्याचा मित्र रॉनी मॅसी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

जाणून घ्या प्रकरण? नीलम शर्मा आपल्या कुटुंबासोबत आग्रा येथे राहत होत्या. 20 फेब्रुवारी 2014 रोजी नीलम यांचे पती विजय शर्मा, त्यांची मुलगी आणि मुलगा फिरोजाबाद येथे लग्नासाठी गेले होते. नीलम घरी एकट्याच होत्या. त्यांच्यासोबत घरात पाळीव कुत्रा आणि पोपट होते. कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना नीलम आणि पाळीव कुत्रा जॅकी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. त्या दोघांचाही चोकूने भोसकून खून केला होता. तसेच, घरातून सर्व दागिने आणि रोख रक्कमही चोरीला गेले होते. 

पोपटाने केला खुलासामहिलेच्या मृत्यूनंतर घरातील पोपट टोटोही पूर्णपणे शांत झाला होता. नीलम पोपटावर खूप जीव लावायच्या. पोपट अचानक शांत झाल्यामुळे घरच्यांना संशय आला. एके दिवशी पती विजय आणि मुलगी पोपटासमोर रडायला लागल्या आणि संतापून पोपटाला विचारले, 'नीलमचा खून झाला आणि तू काहीच करू शकत नाहीस, नीलमला कोणी मारले ते सांग.' यानंतर विजयने पोपटासमोर त्या सर्व लोकांची नावे घेतली, ज्यांच्यावर संशय होता. यावेळी भाच्चा आशूचे नाव घेताच पोपट जोरजोरात ओरडू लागला.

आरोपीची पोलिसांसमोर कबुलीआशूचे नाव ऐकताच टोटो आशू-आशू ओरडायला लागला. आशूनेच नीलमची हत्या केल्याचा कुटुंबीयांचा संशय खरा ठरला. यानंतर विजय शर्माने याबाबत पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आशुला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने त्याचा मित्र रॉनी मॅसीसोबत हा खून केला होता. नीलमचे तिच्या मुलापेक्षा तिच्या भाच्च्यांवर जास्त जीव लावला होता. आशुला घरात ठेवलेल्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या. पैशाच्या लालसेपोटी त्याने माउशी नीलम यांची हत्या केली. आशूने नीलमवर चाकूने 14 वार केले. हा संपूर्ण प्रकार पोपटाच्या डोळ्यासमोर घडत होता. पोपटाच्या साक्षीमुळेच पोलिस आशूपर्यंत पोहोचू शकले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीagra-pcआग्राPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू