शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर कारागृहातून पॅरोलवरील फरार आरोपी विश्रांतवाडीत जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 21:02 IST

कुख्यात गुंड भरत त्यागी टोळीचा सदस्य असून त्याच्यावर खुनाचे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. खुनाच्या गुन्ह्यात कोल्हापूर कारागृहात तो शिक्षा भोगत होता.

विमाननगर : सांगली येथील खूनाच्या चार गुन्ह्यातील पॅरोलवरील फरार आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी शुक्रवारी जेरबंद केले. कुख्यात गुंड भरत त्यागी टोळीतील सदस्य धैर्यशील संपतराव कांबळे (वय ४०, रा.सांगली) याला ताब्यात घेऊन कुरळप पोलिस स्टेशनच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोल्हापूर कारागृहातून तो  पॅरोल रजेवर बाहेर होता. पॅरोलची मुदत संपूनही तो परत कारागृहात हजर झाला नव्हता. याप्रकरणी कुरळप पोलिस स्टेशन, सांगली येथे दाखल गुन्ह्यात त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली येथील सराईत गुन्हेगार धैर्यशील कांबळे हा शांतीनगर बुध्दविहाराजवळ येणार असल्याची माहिती पोलिस शिपाई अनिकेत भिंगारे यांना मिळाली होती. तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक राहूल घुगे यांनी कर्मचार्यांसह सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. सांगली येथील कुख्यात गुंड भरत त्यागी टोळीचा सदस्य असून त्याच्यावर खूनाचे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. खूनाच्या गुन्ह्यात कोल्हापूर कारागृहात तो शिक्षा भोगत होता. जून २०१९ पासून  पॅरोल रजेवर तो बाहेर आला होता. मुदतीत कारागृहात न परतल्यामुळे त्याच्या विरुद्ध कुरळप पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हि कबूली दिली. अतिरिक्त पोलिस आयुक्त(पूर्व) सुनिल फुलारी, पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू,सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख उपनिरीक्षक राहूल घुगे, पोलिस कर्मचारी विजय सावंत, यशवंत किर्वे, प्रविण भालचिम, किशोर दुशिंग, रिहाण पठाण,अनिकेत भिंगारे,प्रफुल्ल मोरे,शेखर खराडे यांच्या पथकाने हि कारवाई केली. या सराईत आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा कुरळप पोलिसांच्या ताब्यात दिले. 

टॅग्स :Puneपुणेkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस