पार्किंग केलेला ट्रक सकाळी झाला गायब; चोरीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 16:51 IST2021-11-25T16:50:55+5:302021-11-25T16:51:22+5:30
Robbery Case :कल्याण-अंबरनाथ रस्त्या शेजारी फॉरवर्ड चौकात राधास्वामी सत्संग येथील रस्त्याच्या कडेला निशांनसिंग संदु यांनी ट्रक क्रंमांक एम एच १५, डी के ४९५५ हा ट्रक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या ८ वाजता पार्किंग केला होता. यादरम्यान ट्रकची शोधाशोध केला असता चक्क ट्रक चोरीला गेल्याचे उघड झाले.

पार्किंग केलेला ट्रक सकाळी झाला गायब; चोरीचा गुन्हा दाखल
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३ मधून जाणाऱ्या कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरील राधास्वामी सत्संग येथे निशांनसिंग संदु यांनी १३ नोव्हेंबर रोजी रात्री एम एच-१५, सी-४९५५ नंबरचा ट्रक पार्किंग केला होता. सकाळी पार्किंग केलेला ट्रक नसल्याने, शोधाशोध केली. अखेर ट्रक चोरीची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल केली.
उल्हासनगरात मोटारसायकल व चार चाकी गाडी चोरीच्या घटनेत वाढ झाली. मात्र चक्क ट्रक चोरीला जाईल, असे कधी वाटले नाही. शहरातून जाणाऱ्या कल्याण-अंबरनाथ रस्त्या शेजारी फॉरवर्ड चौकात राधास्वामी सत्संग येथील रस्त्याच्या कडेला निशांनसिंग संदु यांनी ट्रक क्रंमांक एम एच १५, डी के ४९५५ हा ट्रक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या ८ वाजता पार्किंग केला होता. यादरम्यान ट्रकची शोधाशोध केला असता चक्क ट्रक चोरीला गेल्याचे उघड झाले. अखेर सिंधू यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्या विरोधात तकार दाखल केली. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत