शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूलचा धाक दाखवून लुटणारे पार्सल जेवणाच्या रॅपरवरुन आले पोलिसांच्या तावडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 21:50 IST

Crime News : पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त; नाशिकच्या चामरलेणीजवळील घडलेल्या गुन्ह्याचा 24 तासांत छडा

ठळक मुद्देतेथे डोंगराच्या पायथ्याशी फोटोसेशन करत असताना तेथे संशयित लुटारूंची टोळी आली.

नाशिक : म्हसरूळ शिवारातील चामरलेणी येथे फिरायला गेलेल्या पंचवटीतीलचौघा जॉगर्सला पिस्तूलाचा धाक दाखवून मारहाण करत त्यांच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने पाच आयफोन मोबाइल असा सुमारे पावणे तीन लाख रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेणाऱ्या टोळीचा म्हसरूळ पोलिसांना अवघ्या 24 तासांत छडा लावून बेड्या ठोकल्या. दोन दिवसांपूर्वी नवीन आडगाव नाका विजयनगर कॉलनीत राहणारा फिर्यादी ब्रज अक्षय शहा व त्याचे अन्य तीन मित्र रविवारी दुपारी चामरलेणी येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथे डोंगराच्या पायथ्याशी फोटोसेशन करत असताना तेथे संशयित लुटारूंची टोळी आली.

टोळीतील एकाने हस्तीदंताचे गळ्यात लॉकेट घातलेल गुन्हेगाराने पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, हातातील ब्रेसलेट तसेच पाच आयफोन व पंधराशे रुपये रोख असा 2 लाख 66 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ गुन्हे शोध पथकाला संशयितांचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या. त्यानंतर काही वेळाने ढोकणे यांना गुप्त बातमीदारामार्फत लूट करणाऱ्या संशयितांची माहिती मिळाली तसेच घटनास्थळी पोलिसांना हॉटेलातून आणलेल्या जेवणाचे पार्सलचे बांधणीचे वेष्टणही (रॅपर) मिळाले. त्यावरुन पोलिसांनी त्या हॉटेलचा शोध घेतला. हॉटेलमध्ये जाऊन पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात एक संशयिताचे वर्णन मिळाले. पोलिसांनी पाळत ठेऊन त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा रचला मात्र त्यास संशय आल्याने तो घराजवळून निसटून गेला. त्यावरून या गुन्ह्यातील संशयित निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित संदीप सुधाकर पगारे, आनंद रघुनाथ जाधव (दोघे रा, फुलेनगर) सुनील गायकवाड (रा. औरंगाबादरोड), रवी कचरू निकम (रा.ओमनगर, मेहरधाम) यांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, पोलिस उपनिरीक्षक व्ही. के. माळी, गणेश रेहरे, मयूर पवार, संजय पवार यांच्या पथकाला या संशयितांच्या मुसक्या बांधण्यात यश आले. इन्फो बॉक्स खंडणीच्या गुन्ह्यातील फिर्यादी निघाला संशयित आरोपी जबरी चोरीच्या प्रकरणात म्हसरूळ पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांपैकी संदीप पगारे हा पंचवटी पोलिसांकडे दाखल असलेल्या एका खंडणी वसुलीच्या गुन्ह्यातील फिर्यादी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पगारे हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे म्हसरूळ पोलिसांनी सांगितले. याने आपण भाजीपाला विक्री व्यवसाय करत असून व्यवसाय करण्यासाठी संशयित विशाल भालेराव व त्याच्या साथीदारांनी पन्नास हजार रुपये खंडणी मागितली अशी तक्रार काही दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्यात येऊन दिली होती. आता त्याने दिलेली तक्रार खरी की खोटी याबाबत पुढील तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNashikनाशिकArrestअटक