शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिगांनी सायबर तज्ञाला दिले होते ५ लाख अन् अँटिलीया स्फोटक प्रकरणात केली फेरफार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 20:51 IST

Antilia Case :माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अँटिलीया स्फोटक प्रकरणाची फेरफार करण्यासाठी जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा सायबर तज्ज्ञांनी केला आहे.

ठळक मुद्देNIAने  सायबर तज्ञाचा ५ ऑगस्टला जबाब नोंदवला होता. तेव्हा त्येनं तो अनेक आयपीएसला सायबरशी संबंधित ट्रेनिंग देतो असे सांगितले.

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दाखल केलेल्या एका आरोपपत्रात एजन्सीमधील एका सायबर तज्ज्ञाने धक्कादायक माहिती दिली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अँटिलीया स्फोटक प्रकरणाची फेरफार करण्यासाठी जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड केली असल्याचा दावा सायबर तज्ज्ञांनी केला आहे. यासाठी  परमबीर सिंग यांनी सायबर तज्ज्ञाला ५ लाखांची लाच दिली असल्याचंही त्यानं सांगितलं आहे.

NIAने  सायबर तज्ञाचा ५ ऑगस्टला जबाब नोंदवला होता. तेव्हा त्येनं तो अनेक आयपीएसला सायबरशी संबंधित ट्रेनिंग देतो असे सांगितले. सोबतच काही इंटेलिजेंस एजन्सी सोबतही काम करतो अशी माहिती दिली. ९ मार्च २०२१ रोजी  मुंबई पोलीस  आयुक्तांच्या कार्यालयात ट्रेनिंग संबंधी चर्चेसाठी गेलो होतो, अशीही धक्कादायक माहिती त्याने दिली. 

सायबर तज्ज्ञाने एनआयएला आपला जबाब नोंदवला होता. ज्यामध्ये सायबर तज्ज्ञाने अँटिलिया घटनेनंतर जैश-उल-हिंद या दहशदवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्विकारली, असे त्यांना त्यांच्या अहवालात लिहिण्यास सांगितले असल्याची माहिती दिली. त्यासाठी दिल्लीत इस्रायल दूतावासासमोर स्फोट झाल्यानंतर टेलिग्राम चॅनेलचा वापर करण्यात आला. तपास यंत्रणेला सुरुवातीपासूनच  अँटिलीया स्फोटक  प्रकरणात समोर आलेल्या जैश-उल- हिंदच्या कटात परमबीर सिंग यांचा सहभाग असल्याता संशय आहे. मात्र त्यांनी आपल्या आरोपपत्रात परमबीर सिंग यांची भूमिका काय आहे याबाबत काही स्पष्ट केले नाही. मात्र आता सायबर तज्ज्ञाने  परमबीर यांचं नाव घेतलं आहे. त्यामुळे परमबीर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.   

अंबानी यांच्याकडील सुरक्षा प्रमुखाने NIA ला जबाब दिला. २५ फेब्रुवारीला अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली गाडी आढळली. त्याचा जबाब आरोपपत्रात दाखल केला आहे. NIA ने ३ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा