पनवेल तालुक्यात शिवसेनेच्या ग्रा.पं. सदस्यांना मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 00:35 IST2021-01-31T00:34:48+5:302021-01-31T00:35:05+5:30
सध्या पनवेल तालुक्यात भाजपचे वर्चस्व आहे. शिवसेना तालुक्यात वाढत असल्याने नव्याने निवडून आलेल्या सेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांना मारहाण झाल्याने जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.

पनवेल तालुक्यात शिवसेनेच्या ग्रा.पं. सदस्यांना मारहाण
पनवेल : सध्या पनवेल तालुक्यात भाजपचे वर्चस्व आहे. शिवसेना तालुक्यात वाढत असल्याने नव्याने निवडून आलेल्या सेनेच्या ग्रामपंचायत सदस्यांना मारहाण झाल्याने जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
सेनेच्या ग्रामपंचायत केवाळेचे सदस्य अभिराज डांगरकर व वाकडीचे सदस्य नामदेव म्हसकर यांना शुक्रवारी त्यांच्या घरी जाऊन मारहाण केली. तसेच शिवसेना पक्षाचा शिवीगाळ करून आपमान केला. अभिराज डांगरकर यांना जास्त मार लागल्यामुळे दुखापत झाली आहे. जखमींवर कामोठे एमजीएम रुग्णालयात त उपचार चालू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी यासंदर्भात चर्चा करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.