शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

...अन् आणखी एका महिलेने लगावली कारचालकाच्या कानशिलात, भररस्त्यात केली बॅटने मारहाण; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 17:36 IST

Woman beats up car driver in panipat video viral : एका महिलेने कारचालकांशी आधी वाद घातला. त्यानंतर त्याच्या कानशिलात लगावली. तिने बॅटने देखील त्याला मारहाण केली.

नवी दिल्ली - लखनऊमध्ये भररस्त्यात एका तरुणीने कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून संतापाची लाट उसळली आहे. तरुणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकारानंतर आता अशीच दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी एका महिलेने कारचालकाच्या कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरच ती महिला थांबली नाही तर तिने बॅटने देखील कारचालकाला मारहाण केली आहे. 

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणारा हा व्हिडीओ पानिपतच्या शेरा गावातील आहे. एका महिलेने कारचालकांशी आधी वाद घातला. त्यानंतर त्याच्या कानशिलात लगावली. तिने बॅटने देखील त्याला मारहाण केली. तसेच आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले आणि कारचालकाची धुलाई केली. जवळपास अर्धा तास रस्त्यावर हा हायवोल्टेज ड्रामा सुरू होता. यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा देखील खोळंबा झाला. कारचालकाने 112 नंबरवर फोन करून आपला जीव वाचवला. तसेच याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

डीएसपी सतीश वत्स यांनी दिेलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं देखील म्हटलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये महिला तरुणाला मारहाण करताना दिसत आहे. लखनऊसारखीच ही घटना असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सरकारी क्वार्टरमध्ये आढळला अल्पवयीन मुलाचा मृतदेह: कुटुंबीयांनी केला दुष्कर्म अन् हत्येचा गंभीर आरोप

राजस्थानच्या बिजलिया परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सरकारी क्वार्टरमध्ये अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी दुष्कर्म आणि हत्येचा गंभीर आरोप केला आहे. शेजारी राहणाऱ्या एका तरुणावर मुलाच्या नातेवाईकांनी आता आरोप केले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका जुन्या सरकारी क्वार्टरमध्ये शिनाख्त परिसरात राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

टॅग्स :IndiaभारतHaryanaहरयाणाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी