खळबळ माजली! ७ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 20:51 IST2022-03-17T20:50:36+5:302022-03-17T20:51:51+5:30
Feticide Found : ड्रेनेज पाईपच्या ठिकाणी ६ ते ७ महिन्याचे पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

खळबळ माजली! ७ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळले
डोंबिवली - मंगळवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास येथील एमआयडीसी निवासी भागातील एम डी ठाकूर मेमोरियल हॉस्पिटलच्या मागील बाजूकडील भिंतीच्या लगत ड्रेनेज पाईपच्या ठिकाणी ६ ते ७ महिन्याचे पुरुष जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. हर्षवर्धन दिलीप ठाकूर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मृत अर्भकाची गुप्तपणे विल्हेवाट लावून अपत्य जन्माची लपवणूक करण्याचे उद्देशाने कोणीतरी हे कुत्य केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. मानपाडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.