खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी  कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 21:43 IST2020-01-08T21:38:54+5:302020-01-08T21:43:28+5:30

पुढील तपास खांदेश्वर पोलीस स करत आहे.

Pangolin smuggler arrested by police | खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी  कारवाई  

खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी  कारवाई  

ठळक मुद्देआरोपी कल्पेश गणपत जाधव (वय 28 ) याला ताब्यात घेतलेटाटा सुमो या वाहनामध्ये खवल्या मांजर ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहे. 

पनवेल - खांदेश्वर पोलिसांना गोपनीय माहिती द्वारे एक इसम  आसूडगाव येथे खवल्या मांजराची तस्करी करण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार खांडेश्वर पोलिसांनी आसूडगाव येथे सापळा रचून आरोपी कल्पेश गणपत जाधव (वय 28 ) याला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळील लाल रंगाच्या टाटा सुमो या वाहनामध्ये खवल्या मांजर ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहे. 


वजन किमान सात किलो 360 ग्राम असं होतं आरोपीला ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याने हे खवल्या मंजर तस्करी करीता आणले असल्याचे कबुली दिली खवल्या जातीचा मांजर जवळ बाळगणे धनदौलत व ऐश्वर्या मिळते असा लोकांचा गैरसमज आहे. या वन्य प्राण्यांची तस्करी व विक्री होत असून त्याला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे आरोपीस अटक करून माननीय न्यायालयात सादर करण्यात आले आहे. पुढील तपास खांदेश्वर पोलीस स करत आहे.

Web Title: Pangolin smuggler arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.