शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Palghar Mob Lynching : पोलीस अधीक्षकांना पाठविले सक्तीच्या रजेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 22:43 IST

Palghar Mob Lynching : याआधी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले. नंतर ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. तसेच ३५ पोलिसांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. 

ठळक मुद्देपोलिस अधीक्षकांचे स्लॅक सुपर व्हिजन झाल्याची बाब गृहमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ह्या प्रकरणी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची माहिती मिळत आहे. त आली होती.  पालघल जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या कारचालकाच्या झालेल्या हत्याकांडाचे पडसाद देशभरात उमटले होते.

पालघर - डहाणू तालुक्यातील मॉब लिचिंग प्रकरणी आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षकांचे स्लॅक सुपर व्हिजन झाल्याची बाब गृहमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ह्या प्रकरणी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याची माहिती मिळत आहे. याआधी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले. नंतर ३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. तसेच ३५ पोलिसांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. 

पालघल जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या कारचालकाच्या झालेल्या हत्याकांडाचे पडसाद देशभरात उमटले होते. त्या दिवशी जमावासमोर त्या साधूंनी हात जोडून आपणास मारू नका, अशी विनवणी केली, मात्र संतप्त जमावाने त्यांचे काही ऐकले नाही. उलट पोलिसांसमोरच त्यांना ठार केले. त्यामुळे, राज्याच्या गृह विभागाने याची तात्काळ दखल घेत, याप्रकरणी पाच पोलिसांचे निलंबन केले होते. त्यानंतर,  येथील पोलीस ठाण्याशी संबंधित ३५ पोलिसांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. 

पालघरमधील या हत्याकांडाला सोशल मीडियावरुन धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे, या घटनेला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका, हे गैरसमजातून घडलेले हत्याकांड आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले होते. तसेच, याप्रकरणी राज्य सरकारने १०० पेक्षा जास्त आरोपींना ताब्यात घेतले असून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले होते. धक्कादायक म्हणजे अटक आरोपींपैकी काही आरोपींना कोरोनाने देखील ग्रासले होते. 

Palghar Mob Lynching : आणखी तीन पोलिसांचे निलंबन तर ३५ जणांची तडकाफडकी बदली 

 

palghar mob lynching : आधी दोन पोलिसांचं निलंबन, पालघर हत्याकांडप्रकरणी पोलिसांवर आणखी मोठी कारवाई

 

Palghar Mob Lynching: गडचिंचलेत भयाण शांतता; आरोपींचा कसून शोध सुरू

टॅग्स :PoliceपोलिसpalgharपालघरAnil Deshmukhअनिल देशमुखMurderखून