पाकिस्तानचा 'नापाक' डाव, भारतावर पुन्हा हल्ल्यासाठी शिजतोय कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 16:44 IST2019-03-07T16:36:17+5:302019-03-07T16:44:19+5:30

भारताने पाकिस्तानच्या सर्व कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचे म्हटलं आहे.

Pakistan's diplomacy, the cut-off for the attack on India's 12 cities | पाकिस्तानचा 'नापाक' डाव, भारतावर पुन्हा हल्ल्यासाठी शिजतोय कट

पाकिस्तानचा 'नापाक' डाव, भारतावर पुन्हा हल्ल्यासाठी शिजतोय कट

ठळक मुद्देभारतावर तीन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी पाकिस्तान करत असल्याचे देखील या दैनिकाच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचा पाकिस्तान कट रचत असल्याबाबत वृत्त पाकिस्तनाच्या ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने दिले आहे. 

नवी दिल्ली - भारतातील १२ शहरांवर बॉम्ब हल्ला करण्याचा पाकिस्तान कट रचत असल्याबाबत वृत्त पाकिस्तनाच्या ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने दिले आहे. भारतावर तीन क्षेपणास्त्रे डागण्याची तयारी पाकिस्तान करत असल्याचे देखील या दैनिकाच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भारताने पाकिस्तानच्या सर्व कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचे म्हटलं आहे.

बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या गुप्त कारवायांना वेग आला आहे. विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेनंतर भारत पाकिस्तान संबंध सुधारण्याचा अंदाज होता. मात्र, पाकिस्तान आपली कूटनीती सोडण्याच्या तयारीत नाही. यामुळेच त्यांनी बॉम्ब हल्ला करण्याची कूटनीती आखली आहे. पाकिस्तानच्या ‘द न्यूज’ या वृत्तपत्राने पाकिस्तान भारतावर क्षेपणास्त्र डागण्याच्या तयारीत आहे असे वृत्त छापल्याने भारतने देखील हा हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी दाखविली आहे. दरम्यान, भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवले असून पाकिस्तान कसलीही चाल करून आल्यास लागल्यास त्या हालचालीस पायबंद घालण्याच्या तयारीत भारतीय लष्कर आहेत. 

Web Title: Pakistan's diplomacy, the cut-off for the attack on India's 12 cities