भयानक! पत्नीची हत्या करुन कढईत उकळू लागला पती; पोटच्या मुलांनी पाहिलं बापाचं घृणास्पद कृत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:02 IST2022-07-15T15:17:53+5:302022-07-15T16:02:20+5:30

पाकिस्तानातील सिंध प्रांतात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं आधी पत्नीचा चेहरा उशीने दाबून तिचा खून केला

pakistani man boils wife in cauldron in front of 6 children | भयानक! पत्नीची हत्या करुन कढईत उकळू लागला पती; पोटच्या मुलांनी पाहिलं बापाचं घृणास्पद कृत्य 

प्रातिनिधीक फोटो

सिंध

पाकिस्तानातील सिंध प्रांतात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं आधी पत्नीचा चेहरा उशीने दाबून तिचा खून केला, नंतर पत्नीचा मृतदेह एका पातेल्यात टाकून आपल्या ६ मुलांसमोरच उकळला. 'जिओ न्यूज'च्या वृत्तात ही माहिती देण्यात आली आहे. ९ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळेच्या कँटीनमध्ये या व्यक्तीनं हे धक्कादायक कृत्य केलं आहे.

जिओ न्यूजच्या रिपोर्टनुसार, आरोपी विक्षिप्त पती शाळेत वॉचमन म्हणून काम करायचा. कथित महिलेचा एक पाय शरीरापासून तोडण्यात आला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. बुधवारी सिंध पोलिसांना नर्गिस नावाच्या महिलेचा मृतदेह एका मोठ्या पातेल्यात सापडला. हा मृतदेह एका खासगी शाळेच्या कँटीनमध्ये पडून होता. जिओ न्यूजनुसार, ही घटना कराचीच्या गुलशन-ए-इकबाल भागातील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती आशिक हा बाजौर एजन्सी येथील रहिवासी होता. शाळेत वॉचमन म्हणून तो काम करत होता. त्यांना शाळेत राहण्यासाठी सर्व्हंट क्वार्टर देण्यात आलं होतं. गेल्या नऊ महिन्यांपासून ही शाळा बंद होती. रिपोर्टनुसार, मृत्यू झालेल्या महिलेच्या १५ वर्षांच्या मुलीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तोपर्यंत आशिक नावाचा नराधम आपल्या तीन मुलांसह पळून गेला होता. सिंध प्रांताचे एसएसपी अब्दुर रहीम शेराजी यांनी सांगितले की, पोलिसांनी उर्वरित तीन मुलांना सुरक्षित ठेवलं आहे. ही घटना पाहून मुलं खूपच घाबरली आहेत.

मुलांनी पोलिसांकडे साक्ष दिली
प्राथमिक तपासात आणि मुलांच्या जबाबावरून असे दिसून आले आहे की आरोपीनं आपल्या पत्नीला भल्यामोठ्या पातेल्यात उकळण्याआधी उशीने गळा दाबून तिची हत्या केली. कढईत महिलेचा एक पाय तिच्या शरीरापासून वेगळा झाला. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: pakistani man boils wife in cauldron in front of 6 children