Pakistan MP Maulana Salahuddin Ayubi marries 14-year-old girl from Balochistan; police launch probe | १४ वर्षाच्या मुलीसोबत पाकिस्तानी खासदारानं केलं लग्न; पोलिसांकडून गुन्हा दाखल

१४ वर्षाच्या मुलीसोबत पाकिस्तानी खासदारानं केलं लग्न; पोलिसांकडून गुन्हा दाखल

ठळक मुद्दे पाक ऑब्जर्व्हरच्या म्हणण्यानुसार, कायद्याने त्या मुलीसोबत नुकताच निकाह झाला. मात्र, अद्याप योग्य विवाह सोहळा पार पडलेला नाही. पाकिस्तानमध्ये कायद्याने १६ वर्षाखालील मुलींच्या लग्नास परवानगी ​​नाही आहे.

चित्राल - बलुचिस्तानमधील राष्ट्रीय विधानसभा (एमएनए) सदस्य  (खासदार) असलेल्या जमात उलेमा-ए-इस्लाम (जेयूआय-एफ) नेते मौलाना सलाहुद्दीन अयुबी यांनी १४ वर्षाच्या मुलीसोबत लग्न केल्याबद्दल पाकिस्तानपोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

मौलाना सलाहुद्दीन अयुबी मतदारसंघ एनए -२६ (किल्ला अब्दुल्ला) येथून जेयूआय-एफ नेते म्हणून राष्ट्रीय विधानसभेवर निवडून गेले. चित्रालमधील महिलांच्या कल्याणासाठी काम करणार्‍या एका स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही चौकशी सुरू केली होती. अंजुमन दावत-ओ-अझीमात यांनी एका अर्जात असे म्हटले आहे की, अल्पवयीन मुलीच्या वयापेक्षा चार पटीने वयाने मोठा असलेल्या बलुचिस्तानमधील एमएनएबरोबर लग्न झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती आणि त्यामुळे लोकांमध्ये नाराजी पसरली होती.

चित्राल पोलिस ठाण्याचे एसएचओ निरीक्षक सज्जाद अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी जुगूर येथील गव्हर्नमेन्ट गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. तिच्या शाळेत तिच्या जन्मतारखेचा उल्लेख २८ ऑक्टोबर २००६ रोजी करण्यात आला होता म्हणजेच तिचे लग्नाचे वय झाले नाही, असे डॉनने सांगितले.

सामाजिक संघटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी काही दिवसांपूर्वी चित्रालच्या घरातील जुगूर भागात मुलीला भेट दिली होती, पण तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न नाकारले होते, असे अहमद यांनी असेही सांगितले आहे. पाक ऑब्जर्व्हरच्या म्हणण्यानुसार, कायद्याने त्या मुलीसोबत नुकताच निकाह झाला. मात्र, अद्याप योग्य विवाह सोहळा पार पडलेला नाही. पाकिस्तानमध्ये कायद्याने १६ वर्षाखालील मुलींच्या लग्नास परवानगी ​​नाही आहे.

Web Title: Pakistan MP Maulana Salahuddin Ayubi marries 14-year-old girl from Balochistan; police launch probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.