नदीलगत झाडावर मृतदेह आढळल्याने खळबळ; हिंजवडी परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 23:27 IST2022-03-30T22:24:50+5:302022-03-30T23:27:43+5:30
४ आठवड्यापूर्वीचा मृतदेह असल्याची शक्यता

नदीलगत झाडावर मृतदेह आढळल्याने खळबळ; हिंजवडी परिसरातील घटना
हिंजवडी : आयटीनगरीतील माण मध्ये नदी किनारी झाडाला अडकलेल्या अवस्थेत मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. माण परिसरातील मुळा नदी जवळील अतिशय निर्जन स्थळी मृतदेह आढळून आला, हिंजवडी पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून मृतदेहास पोस्ट मार्टम साठी सरकारी रुग्णालयात हलवीण्यात आले आहे.
दरम्यान, मयत मुलीचा मृतदेह नदीच्या पाण्यात वाहून जाऊन कोणाला सापडू नये म्हणून, मारेकऱ्यानी मयत मुलीला मारून तिचा मृतदेह झाडावर टांगला असावा अशी चर्चा आहे. किमान चार आठवडे पूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात असून, याचा तपास करण्याचे मोठे आव्हान सद्या हिंजवडीसह पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर असणार आहे. या घटनेमुळे आयटीनगरी परिसरात एकच खळबळ उडाली असून, परिसरात दहशतिचे वातावरण पसरले आहे. हिंजवडी पोलीस अधीक तपास करत आहे.