Out of the house in lockdown, police recovered thousands of fines pda | लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडले, पोलिसांनी वसुल केला हजारोंचा दंड

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडले, पोलिसांनी वसुल केला हजारोंचा दंड

ठळक मुद्देगडचिरोली पोलीस दलाचा दणका वाहनांवर मोपकाअंतर्गत (मोटर परिवहन कायदा) कारवाई करण्यात आली गडचिरोली जिल्ह्यात काही बेजबाबदार नागरिक संचार बंदीचे उल्लंघन करत हुल्लडबाजी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत.

गडचिरोली - संचार बंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणार यांना गडचिरोली पोलीस दलाचा दणका वाहनांवर मोपकाअंतर्गत (मोटर परिवहन कायदा) कारवाई करण्यात आली असून 81 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. संचार बंदीचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू असताना गडचिरोली जिल्ह्यात काही बेजबाबदार नागरिक संचार बंदीचे उल्लंघन करत हुल्लडबाजी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांवर गडचिरोली पोलीस दलाने जिल्हाभरात कारवाईचा बडगा उचलला असून संचार बंदीच्या काळात जिल्ह्याभरात आजपर्यंत एकूण 322 वाहनांवर मोटर परिवहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण 81 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. संचारबंदीच्या काळात जनतेला जीवनावश्यक साहित्याची अडचण भासू नये यासाठी शासनाने जीवनावश्यक साहित्याची सेवा देणाऱ्या केंद्रांना सूट दिलेली आहे.  

परंतु काही बेजबाबदार नागरिक काहीएक कारण नसताना शहरात फिरताना आढळून आल्याने त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लावण्यात आलेल्या संचारबंदीचे सर्व नागरिकांनी पालन करणे आवश्यक असताना काही बेजबाबदार नागरिक केवळ हुल्लडबाजी करण्यासाठी बाहेर पडणार असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत.
 

Web Title: Out of the house in lockdown, police recovered thousands of fines pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.