व्हाॅट्स अ‍ॅपच्यामदतीने घेत ऑर्डर; कॉलेजच्या तरुणांना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 09:22 PM2019-08-27T21:22:53+5:302019-08-27T21:23:59+5:30

व्हाॅट्स अ‍ॅपच्या मदतीने ऑर्डर घेऊन तो कॉलेजमधील तरुणांपर्यंत गांजा पोहचवत असे.

Order by way of whats app; both are arrested who selling ganja to college student | व्हाॅट्स अ‍ॅपच्यामदतीने घेत ऑर्डर; कॉलेजच्या तरुणांना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या 

व्हाॅट्स अ‍ॅपच्यामदतीने घेत ऑर्डर; कॉलेजच्या तरुणांना गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या 

googlenewsNext
ठळक मुद्दे सुनिल दास असं या तस्कराचं नाव आहे.  दुसरीकडे आझाद मैदान युनिटनेही अरमान शेख (२०) याला बीपीटी काॅलनी वाडीबंदर येथून गांजा तस्करीप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणी एएनसीचे पोलीस अधिक तपास करत आहेत.  

मुंबई - अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) महाविद्यालयीन तरुणांना गांजाची विक्री करणाऱ्या तस्कराला अटक केली आहे. सुनिल दास असं या तस्कराचं नाव आहे. व्हाॅट्स अ‍ॅपच्या मदतीने ऑर्डर घेऊन तो कॉलेजमधील तरुणांपर्यंत गांजा पोहचवत असे. तर अरमान शेख (२०) यालाही बीपीटी काॅलनी वाडीबंदर येथून गांजा तस्करीप्रकरणी अटक केली आहे. 

मुंबईत पश्चिम उपनगरात नामांकित महाविद्यालये आहेत. उच्चभ्रू सोसायटी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी गांजाचं व्यसन करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर संबंधित काॅलेजच्या मुलांना गांजाची तस्करी करणाऱ्या तस्कराच्या मागावर अमली पदार्थ विरोधी पथक होते. त्यावेळी सुनिल छुप्या पद्धतीने गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सुनिलला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचला होता. पोलिसांनी त्याला वांद्रे परिसरातून अटक केली. त्याच्याजवळून १ लाख ८० हजार रुपयांचा गांजा हस्तगत केला आहे. तसेच दुसरीकडे आझाद मैदान युनिटनेही अरमान शेख (२०) याला बीपीटी काॅलनी वाडीबंदर येथून गांजा तस्करीप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याजवळून पोलिसांनी ३ लाख २० हजार रुपयांचा गाजा हस्तगत केला आहे. या प्रकरणी एएनसीचे पोलीस अधिक तपास करत आहेत.  

Web Title: Order by way of whats app; both are arrested who selling ganja to college student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.