In order to sanctify the soul, bhondubaba told she would have to become naked | आत्मा पवित्र करण्यासाठी भोंदूबाबाने गायिकेला नग्न होण्यास सांगितले  

आत्मा पवित्र करण्यासाठी भोंदूबाबाने गायिकेला नग्न होण्यास सांगितले  

ठळक मुद्देया प्रकरणी चारकोप पोलिसांनी उमेश रमाशंकर पांडे या भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहे. व्यावसायिक प्रगतीच्याआड तुझ्या शरीरातील अपवित्र आत्मा येत असल्याने आत्मा पवित्र करण्यासाठी नग्न होण्यास सांगितले.एका भोंदूबाबाने २१ वर्षीय गायिकेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात घडली.

मुंबई - घरात भरभराट, समृद्धी आणि व्यावसायिक वृद्धीच्या आड तुझ्या शरीरातील अपवित्र आत्मा येत असल्याची भिती दाखवत एका भोंदूबाबाने २१ वर्षीय गायिकेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना कांदिवली पश्चिम येथील चारकोप परिसरात घडली. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी उमेश रमाशंकर पांडे या भोंदूबाबाला बेड्या ठोकल्या आहे.

पीडीत गायिका रिमिक्स अल्बमसाठी काम करते. ती चारकोपमध्ये संगीतकार पतीसह भाड्याच्या घरात राहते. उमेश रमाशंकर पांडे हा आरोपी देखील चारकोप परिसरामध्ये राहतो. घरात सुख, शांती समृद्धी आणि भरभराट यावी यासाठी दोघांनी घरात पूजापाठ करण्याचं ठरवले. दोघेही पूजेसाठी पुजारी शोधत होते. यावेळी त्यांची उमेश पांडेशी ओळख झाली. रविवारी पांडेला पूजेसाठी घरी बोलावले. पूजापाठ झाल्यानंतर भोंदूबाबा उमेश पांडेने तिच्या पतीला घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर भोंदूबाबाने तिला व्यावसायिक प्रगतीच्याआड तुझ्या शरीरातील अपवित्र आत्मा येत असल्याने आत्मा पवित्र करण्यासाठी नग्न होण्यास सांगितले. तसेच नंतर भोंदूबाबाने नको ते कृत्य करण्यास सांगितल्याने गायिकेच्या सर्व प्रकार लक्षात आला. तसेच पती घराबाहेर गेल्यानंतर महिला घरी एकटीच असल्याचा फायदा घेऊन पांडेने तिच्यावरबलात्काराचा प्रयत्न केला. 

तिचा पती काही वेळाने घरी आल्यानंतर घडलेला प्रकार तिने सांगितला. त्यानंतर पीडित महिलेने पतीसह चारकोप पोलिसांकडे धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी उमेश पांडेला अटक केली. पीडित महिला आणि आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मंगळवारी आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: In order to sanctify the soul, bhondubaba told she would have to become naked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.