विवाहितेवर अत्याचार; आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 12:22 IST2021-05-31T12:22:43+5:302021-05-31T12:22:48+5:30

Crime News : पोलिसांनी आरोपीविरोधात २९ मे रोजी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. 

Oppression of the married; Accused arrested | विवाहितेवर अत्याचार; आरोपीस अटक

विवाहितेवर अत्याचार; आरोपीस अटक


लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या एका गावात २८ वर्षीय विवाहित महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना २७ मे रोजी घडली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात २९ मे रोजी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. 
अमडापूर पोलिस ठाण्यातंर्गतच्या एका गावात एक विवाहिता घरी एकटीच होती. या संधीचा फायदा घेत आरोपी सुनील कोल्हे याने पीडित महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. पीडित महिलेचा पती हा घरी नसल्याची संधी साधत त्याने हे कृत्य केले. २७ मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. प्रकरणी पीडित महिलेने अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून पोलिसांनी आरोपी सुनील कोल्हे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.  घटनेचा पुढील तपास ठाणेदार अमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोनवणे हे करत आहेत. अमडापूर परिसरात अलिकडील काळात महिला वरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.

Web Title: Oppression of the married; Accused arrested