सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी, मुंबई सेंट्रलच्या वोकहार्ट रुग्णालयाबाहेर होता पोलिस बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 11:25 PM2021-09-14T23:25:33+5:302021-09-14T23:26:23+5:30

Sachin Vaze : वाझेची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टराकड़ून सांगण्यात आले.

Open Heart Surgery done on sachin vaze, outside Mumbai Wockhardt Hospital in Mumbai Central | सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी, मुंबई सेंट्रलच्या वोकहार्ट रुग्णालयाबाहेर होता पोलिस बंदोबस्त

सचिन वाझेवर ओपन हार्ट सर्जरी, मुंबई सेंट्रलच्या वोकहार्ट रुग्णालयाबाहेर होता पोलिस बंदोबस्त

Next

मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेवर मंगळवाऱी ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर वाझेवर मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात सर्जरी करण्यात आली आहे. यावेळी रुग्णालयाबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
          
सचिन वाझे गेले काही दिवस भिवंडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. हृदय विकाराचा त्रास असल्याने शस्त्रक्रियेसाठी सोमवारी मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवाऱी ओपन हार्ट सर्जरी पार पडली. कार्डिअॅक सर्जन डॉ कमलेश जैन आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ अंकुर आणि डॉ केदार यांच्या टीमने वाझेवर शस्त्रक्रिया केली. वाझेची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टराकड़ून सांगण्यात आले.

Web Title: Open Heart Surgery done on sachin vaze, outside Mumbai Wockhardt Hospital in Mumbai Central

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app