शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ उन्हाळ्यात चाेरी करणाऱ्यास पोलिसांकडून अटक; १३ वर्षापासून करायचा चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 02:24 IST

रेल्वे पाेलिसांची कारवाई, अवघ्या २४ तासात दादर पोलिसांनी या चोराला मुंबई सेंट्रलमधील एका लॉजमधून ताब्यात घेतले आहे.

मुंबई :  मुंबईत एक चोर गेल्या १३ वर्षांपासून फक्त उन्हाळ्याच्या मोसमातच धावत्या रेल्वेमध्येचोरी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरट्याचे नाव चकनलाल बाबुलाल सोनकर आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. गेल्या १३ वर्षांपासून मुंबईत फक्त उन्हाळ्याच्या मोसमात चोरी करतो.  स्थानिक पोलिसांच्या मदतीने दादर लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली  आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये पहाटे प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून एक चोरटा पळून गेला. याबद्दची तक्रार महिला प्रवासी यांनी पोलिसांकडे केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांकडून दादर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असतात. एक व्यक्ती महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून फलाटावर उडी मारून पळून गेला होता. त्यानुसार पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकावरील  संपूर्ण  सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच लोहमार्ग पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने या चोरट्यांचा शोध लावून त्याला अटक केली आहे.

मार्च ते मे या तीन महिन्यात  चकनलाल मुंबईत येऊन लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये चोरी करत होता. तो नुकताच मुंबईत आला होता. चकनलालवर अगोदरच विविध लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हांची नोंद आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असून मुंबईतील संपूर्ण लॉज आणि रेस्टॉरंटमध्ये छापे टाकत त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अवघ्या २४ तासात दादर पोलिसांनी या चोराला मुंबई सेंट्रलमधील एका लॉजमधून ताब्यात घेतले आहे.

अशी करत होता चोरीउन्हाळ्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करताना प्रवासी खिडक्या उघड्या ठेवून प्रवास करतात. विशेषतः महिला गर्मीमुळे खिडकीत बसून प्रवास करणे पसंत करतात, हीच संधी हेरून हा चोर या महिलांना लक्ष्य करत होता. महिला प्रवाशांचे दागिने खिडकीतून चोरून पसार व्हायचा. त्यानंतर पोलिसांनी पकडू नये म्हणून तो दक्षिण मुंबईतील दररोज वेगवेगळ्या लॉजवर राहत होता. त्यामुळे कोणाला आपला पत्ता लागू नये, हा त्यामागचा उद्देश होता.

 

टॅग्स :theftचोरीrailwayरेल्वेPoliceपोलिस