शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइनद्वारे घातला ७३ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 14:29 IST

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

डोंबिवली : ब्रिटन वरून पाठवलेले गिफ्ट पार्सल इंडियन कस्टमने पकडले असून, त्याची कस्टम ड्युटी म्हणून वेगवेगळ्या बँक खात्यावर काही रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगून एका तरुणीला ७३ लाख आठ हजारांचा ऑनलाइन गंडा घातला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक झालेली २९ वर्षांची तरुणी डोंबिवली पूर्वेतील पलावा, कासाबेला गोल्ड परिसरात राहते. डॅनियल जेन्स नामक व्यक्तीने  एका मोबाइल नंबरवरून तक्रारदार तरुणीशी व्हॉट्सॲपद्वारे चॅटिंग करून मैत्री केली. मैत्रीच्या माध्यमातून ओळख वाढवली आणि ब्रिटनमधून गिफ्ट पार्सल पाठवतो, असे तिला त्याने सांगितले. त्यानंतर त्याने फ्रॅक विल्सन, जॅक्सन, जोन लॅम्बर्ड, रियाझ यांनी विविध मोबाइल क्रमांकावरून तरुणीला संपर्क साधत ब्रिटन वरून पाठवलेले गिफ्ट पार्सल इंडियन कस्टमने पकडले असून, त्याचे कस्टम ड्युटी म्हणून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ७३ लाख आठ हजार रुपये ट्रान्सफर कर, असे सांगून त्या तरुणीची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. हा सर्व प्रकार १० नोव्हेंबर २०२१ ते २५ जुलै २०२२ दरम्यान घडला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

टॅग्स :fraudधोकेबाजीMONEYपैसाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस