शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

एक वर्षाच्या मुलीवर मालाडमध्ये बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 3:20 AM

मालाड पश्चिमेत राहणाऱ्या या मुलीच्या शेजारच्याच घरात आरोपी राहात होता. तो कॅटरिंगचे काम करतो. शुक्रवारी आरोपीने मुलीला खेळायला नेले. त्यानंतर तिला चॉकलेट देतो असे सांगून तिला जवळच्या गार्डनमध्ये नेले.

मुंबई : चॉकलेट खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून एक वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार सोमवारी मालाडमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.मालाड पश्चिमेत राहणाऱ्या या मुलीच्या शेजारच्याच घरात आरोपी राहात होता. तो कॅटरिंगचे काम करतो. शुक्रवारी आरोपीने मुलीला खेळायला नेले. त्यानंतर तिला चॉकलेट देतो असे सांगून तिला जवळच्या गार्डनमध्ये नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर तिला घरी सोडले. मात्र घरी आलेल्या समीराचे रडणे काही केल्या थांबत नसल्याने पालकांनी तिला डॉक्टरकडे नेले. तपासणीत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा संशय आल्याने डॉक्टरांनी समीराला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. शताब्दीमधील डॉक्टरांनी तिला तपासून तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. याबाबत मालाड पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार मालाड पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला तो काहीही सांगण्यास टाळाटाळ करू लागला, मात्र नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉर्ज फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारMumbaiमुंबई