शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वानवडीत पूर्ववैैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करुन एकाचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 12:06 IST

पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघा जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केला़.

ठळक मुद्देख्रिसमस साजरा करताना घडला प्रकार

पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून चौघा जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार करुन त्याचा खुन केला़. ही घटना वानवडीतील शांतीनगर समोरील काटवनात सोमवारी रात्री अकरा वाजता घडली़. ख्रिसमस साजरा करत असताना हा प्रकार घडला़. खन्ना परदेशी (वय ४०, रा़. वानवडी बाजार) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे़. याप्रकरणी सबॅस्टीन सॅम्युअल जॉन (वय ३१, रा़. वानवडी व्हिलेज, वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे़. वानवडी पोलिसांनी बबलू ऊर्फ हैदर परदेशी (रा़. सर्व्हट क्वार्टस पद्मव्हिला सोसायटीसमोर, वानवडी), अक्षय विनोद कांबळे (रा़ .वानवडी बाजार) आणि त्यांच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़. खन्ना आणि परदेशी, कांबळे हे मित्र असून ते पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत़. वानवडी पोलिसांनी हैदर परदेशी याला अटक केली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी अक्षय कांबळे व बबलु परदेशी यांच्याबरोबर खन्ना याचा ऑक्टोबर २०१८ मध्ये वाद झाला होता़ यावेळी खन्ना याने दगडाने मारहाण करत कांबळे याला शिवीगाळ केली होती़. सबॅस्टीन व खन्ना हे दोघे सोमवारी रात्री काटवनात दारु पीत बसले होते़. त्यांची दारु संपल्यानंतर त्यांनी आणखी दारु आणून पिली़. त्यानंतर त्यांना झोप लागली़. रात्री सबॅस्टीन याला मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडाने जाग आली़. तेव्हा कांबळे, परदेशी व अन्य दोघे जण तेथे दिसले़. अक्षय कांबळे याने सबॅस्टीन याला मारण्याचा प्रयत्न केला़. पण तो पळून गेला़. त्यानंतर त्यांनी खन्ना याच्यावर पालघरने वार करुन त्याचा खुन केला़. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील, पोलीस निरीक्षक रावसाहेब भापकर व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली़. सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. शिंदे अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :WanvadiवानवडीPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMurderखून