One person drowned and dead in the sea of Bandstand | बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात एका इसमाचा बुडून मृत्यू
बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात एका इसमाचा बुडून मृत्यू

ठळक मुद्दे वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश अणावकर यांनी दिली.मृतदेहावर जखमा नसून पुढील तपास सुरु असल्याची माहिती अणावकर यांनी दिली. 

मुंबई - वांद्रे येथील बॅण्ड स्टॅण्डच्या समुद्रात एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. मृत व्यक्तीचे नावं मितुनकुमार ब्रम्हप्रसाद करियार (२९) असं आहे. 

वांद्रे पश्चिमेकडील सीसीडीनजीक बॅण्डस्टॅण्ड समुद्रात एक व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोचले आणि  त्याला समुद्रातून बाहेर काढून भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश यांनी या त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले असून याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश अणावकर यांनी दिली. मृत इसम हा बिहार असल्याची शक्यता असून मृतदेहावर जखमा नसून पुढील तपास सुरु असल्याची माहिती अणावकर यांनी दिली.  


Web Title: One person drowned and dead in the sea of Bandstand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.