शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

लाईफलाईन की डेथलाईन! लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू तर दोनजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 19:09 IST

कळवा, मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झाला अपघात

ठळक मुद्दे तसेच अन्य दोघे प्रवासीही लोकलमधून पडून गंभीररीत्या जखमी झाले असून ते तिघेही मुंब्रा रेल्वेस्थानकात लोकलमध्ये चढले होते. बुधवारी सकाळी ९.५५ वाजण्याच्या सुमारास कळवा-खारेगाव फाटकाजवळ तीन इसम जखमी अवस्थेत पडल्याची माहिती कळवा रेल्वेस्थानकावरील बुकिंग क्लार्ककडून लोहमार्ग पोलिसांना समजली.

ठाणे - मुंबईकरांची लाईफलाईन आता दिवसेंदिवस डेथलाईन होत चालली आहे. रेल्वेवरचा प्रवास हा सुखकर होण्याऐवजी घातक होत चालला आहे. कळवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान तीन प्रवासी लोकलमधून पडून अपघात घडला आहे. यापैकी दोन प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या लोकलमधील गर्दीने पुन्हा एका प्रवाशाचा बळी घेतल्याची घटना बुधवारी कळवा रेल्वेस्थानकादरम्यान घडली. तसेच अन्य दोघे प्रवासीही लोकलमधून पडून गंभीररीत्या जखमी झाले असून ते तिघेही मुंब्रा रेल्वेस्थानकात लोकलमध्ये चढले होते. यातील मयत हा लग्नासाठी उत्तर प्रदेश येथून मुंबईत आला होता. तिघांची ओळख पुढे आली असली, तरी ते तिघे एकाच वेळी एकाच लोकलमधून पडले आहेत का? याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही, अशी माहिती ठाणो लोहमार्ग पोलिसांनी दिली.

जखमींवर ठामपाच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसी लोकल सुरू करणा:या रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या वेळी साध्या लोकलची संख्या वाढविली, तर नाहक जाणारे बळी थांबतील, अशा संतप्त भावना प्रवाशांतून व्यक्त होत आहेत. बुधवारी सकाळी ९.५५ वाजण्याच्या सुमारास कळवा-खारेगाव फाटकाजवळ तीन इसम जखमी अवस्थेत पडल्याची माहिती कळवा रेल्वेस्थानकावरील बुकिंग क्लार्ककडून लोहमार्ग पोलिसांना समजली. त्यानुसार, लोहमार्ग पोलीस हे हमाल अणि स्ट्रेचर घेऊन तेथे पोहोचले. त्यावेळी एका व्यक्तीला स्थानिकांनी कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले होते. तसेच एक जण जागीच मयत झाला होता. तिसऱ्यालाही रुग्णालयात तातडीने नेले.

<blockquote class="twitter-tweet"><p lang="en" dir="ltr">Thane: One dead, two injured after they fell from a moving train between Mumbra and Kalwa stations, today. <a href="https://twitter.com/hashtag/Maharashtra?src=hash&amp;ref_src=twsrc%5Etfw">#Maharashtra</a></p>&mdash; ANI (@ANI) <a href="https://twitter.com/ANI/status/1225017844603031554?ref_src=twsrc%5Etfw">February 5, 2020</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

लोकलच्या धडकेने राष्ट्रवादीच्या कार्यालयीन सचिवाचा मृत्यू

लाइफलाइन डेथलाइन होण्यापासून रोखणे गरजेचे

लोकलमधून पडून तिघे जखमी; तरुणीसह दोन तरुणांचा समावेश

जखमी मोहम्मद अबू ओसामा शेख (२३) आणि इम्तियाज गुलाम हैदर (४२) हे जखमी असलेले दोघे मुंब्य्रात राहणारे आहेत. त्यातील मोहम्मद हे बोलण्याच्या स्थितीत नव्हते. तर, इम्तियाज हे व्यवसायाने टेलर असून ते सकाळी मुंब्रा येथून सीएसएमटीला लोकल पकडून जात होते. त्यावेळी गाडीला गर्दी होती. ते दरवाजात उभे असताना गाडीने वेग घेतल्यावर त्यांचा हात सटकल्याने तोल जाऊन खाली पडले. त्याच डब्यातून इतर कुणास पडलेले पाहिले नसल्याचे त्यांनी ठाणो जीआरपीला सांगितले. तसेच तिसरा मयत हाजी रईस अहमद (५३) हे मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. ते मुंबईत लगAासाठी आले होते. बुधवारी लगA असल्याने ते लग्नासाठी लोकल पकडून मुंबईला जात होते. त्यावेळी लोकलमधून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणो लोहमार्ग पोलिसांनी दिली.

 

टॅग्स :Accidentअपघातrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेDeathमृत्यू