Girlfriend's Clash: एकच प्रियकर! हायफाय आजी-माजी प्रेयसी भररस्त्यात भिडल्या; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 12:27 IST2021-10-27T11:49:06+5:302021-10-27T12:27:09+5:30
Girlfriend's Clash on Lucknow's road: पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सध्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. आता मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भूतपूर्व प्रेयसीने त्या तरुणावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

Girlfriend's Clash: एकच प्रियकर! हायफाय आजी-माजी प्रेयसी भररस्त्यात भिडल्या; Video व्हायरल
उत्तर प्रदेशची राजधानी लखनभमधील एक मारहाणीचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. लखनऊच्या बाराबीरवा चौकात एका हॉटेलबाहेर सोमवारी रात्री उशिरा दोन तरुणींमध्ये जोरदार लाथा-बुक्क्या चालल्या.
धक्कादायक बाब म्हणजे त्या दोघींचा एकच प्रियकर होता. एक ब्रेकअप झालेली तर दुसरी त्या तरुणाची सध्याची प्रेयसी होती. या दोन्ही प्रेयसींमधील मारहाणीचा व्हिडीओ मंगळवारी रात्री व्हायरल झाला. सोमवारी रात्रीची ही घटना आहे. एका हॉटेलबाहेर एक तरुणी थांबली होती. त्यावेळी रॉबीन नावाचा एक तरुण तिथे आला. त्याच्यासोबत दोन तरुणी होत्या. या तरुणींनी एकमेकांकडे पाहताच मारहाण करण्यास सुरुवात केली.
या दोन तरुणी कारमधून आल्या होत्या. त्या पैकी एक त्या तरुणाची सध्याची प्रेयसी होती. तिने कारमधून उतरताच भूतपूर्व प्रेयसीला मारहाण करण्यास व शिव्या देण्यास सुरुवात केली. कारमधून आलेल्या त्या प्रेयसीच्या मैत्रिणीने देखील भूतपूर्व प्रेयसीला मारहाण केली. यामुळे भूतपूर्व प्रेयसी जखमी झाली आणि रस्त्यावर पडली. पोलिसांनी भूतपूर्व प्रेयसीच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला आहे.
लखनौच्या रस्त्यावर एकाच प्रियकरावरून दोन तरुणी भिडल्या. #ViralVideo#viral#Lucknowpic.twitter.com/WA7TYw8oHZ
— Digambar Raswe (@draswe123) October 27, 2021
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सध्याच्या प्रेयसीला अटक केली आहे. आता मारहाणीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भूतपूर्व प्रेयसीने त्या तरुणावर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.