पिंपरीत सत्संगाच्या नावाखाली उकळले एक लाख रुपये ; फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 13:20 IST2018-12-15T13:20:03+5:302018-12-15T13:20:11+5:30
अम्मा भगवान यांच्याऐवजी दुसऱ्या च कोणाला तरी सत्संगाला आणुन अनुयायींची दिशाभूल करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला.

पिंपरीत सत्संगाच्या नावाखाली उकळले एक लाख रुपये ; फसवणुकीचा गुन्हा दाखल
पिंपरी : अम्मा भगवान यांच्या सत्संगाचा कार्यक्रम असल्याचे भासवुन २०० भाविकांकडून प्रत्येकी ५०० रुपये या प्रमाणे एक लाख रुपये उकळले. याप्रकरणी अस्मिता अनिल राव (वय ३६,हिंजवडी) यांनी चार जणांविरूद्ध फसवणुक केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांकडे शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. चारपैकी एकाला अटक झाली आहे. सिद्धेश राऊत असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, मिलिंद तसेच विठ्ठल सोनवणे आणि सिद्धेश राऊत, मुकुंद वामणे अशी अरोपींची नावे आहेत. अभिनेते निळु फुले नाट्यगृह सांगवी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचा आरोपींनी बोलबाला केला. अम्मा भगवान त्यांचा आश्रम सोडून कोठेही सत्संगाच्या प्रवचानाला जात नाहीत. गेल्या तरी त्यांच्या संस्थेच्यावतीने सत्संगाचे आयोजन केले जाते. आयोजनासाठी स्वयंसेवक पुढाकार घेत असतात. संस्थेची कोणतीही परवानगी न घेता, परस्परपणे सत्संगाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून अम्मा भगवान यांच्या अनुयांयीकडून प्रत्येकी ५०० रुपए आरोपींनी वसूल केले. अम्मा भगवान यांच्याऐवजी दुसऱ्या च कोणाला तरी सत्संगाला आणुन अनुयायींची दिशाभूल करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला. खोटे सांगून अनुयायींची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. सिद्धेश राऊत या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक एस.ए.निकुंभ या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.