पोलीस खबरी असल्याच्या संशयातून एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 20:21 IST2019-12-20T20:21:03+5:302019-12-20T20:21:21+5:30
भामरागड तालुक्यातील नेलगुंडा परिसरात एका इसमाची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली.

पोलीस खबरी असल्याच्या संशयातून एकाची हत्या
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील नेलगुंडा परिसरात एका इसमाची बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली. वृत्त लिहीपर्यंत मृत इसमाची ओळख पटली नव्हती. पोलीस खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी ही हत्या केल्याचे सांगितले जात आहे.
धोडराज ते घोटपाळी या मार्गावरील जंगलाच्या परिसरात शुक्रवारी सकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह दिसला. त्याच्या अंगावर मारहाणीच्या आणि बंदुकीची गोळी लागल्याच्या खुणा होत्या. मृतदेहावर काही नक्षल पत्रके आढळल्याचे समजते. मृत इसमाचे नाव पुसू परसा असून तो मुरगळ या गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परंतू पोलिसांनी अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही.
सदर इसमाचा मृतदेह शवपरिक्षणासाठी भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. अधिक तपास भामरागड पोलीस करीत आहेत.