लघुशंकेच्या वादावरून एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 20:59 IST2018-08-28T20:58:41+5:302018-08-28T20:59:12+5:30

या घटनेचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीसांनी ते तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

one killed in fighting due to loo | लघुशंकेच्या वादावरून एकाची हत्या

लघुशंकेच्या वादावरून एकाची हत्या

उल्हासनगर - उल्हासनगरमधील कॅम्प - 2 येथील खेमानी परिसरात काल रात्री तीन जणांनी लघुशंकेच्या कारणावरून एकाची हत्या केली आहे. या हत्येप्रकरणी एकाला अटक केली असून दोन जण फरार झाले आहेत. उल्हासनगर कॅम्प-2 येथील खेमाणी परिसरात राहणारे चंद्रकांत मोरे हे काल रात्री चायनिज खाण्यासाठी जात असताना कलानी महलच्या पाठीमागे असलेल्या एस. व्ही. एस. शाळेच्याजवळ मोरे यांनी लघुशंका केली. तेव्हा तीन जणांचा मोरे यांच्यासोबत येथे लघुशंका का केली यावरुन वाद निर्माण झाला. तेव्हा त्या तीन जणानी चंद्रकांत मोरे याच्यावर धारदार हत्याराने वार केले. मोरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना त्यांना काही लोकानी उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. या वादाचे पर्यवसन हत्येत झाले. या घटनेचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीसांनी ते तपासासाठी ताब्यात घेतले आहे. 

 

Web Title: one killed in fighting due to loo