शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सावकाराच्या त्रासाला कंटाळून बारामतीत एका शेतकऱ्याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 19:39 IST

तू माझे ३ लाख रुपये व्याजाने घेतलेले आहेत, ते परत कधी करणार, आमचे फोन का घेत नाहीत, असे म्हणून संजय यास आरोपींनी शिवीगाळ केली.

बारामती : सावकाराच्या त्रासाला कंटाळून बारामती शहरातील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ७) घडली आहे. याप्रकरणी दोघा अज्ञातांसह  आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. संजय भानुदास शिंदे (वय ५०, रा. सावंत विश्व बिल्डिंग, तांदूळवाडी रोड, बारामती) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.    याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या पत्नी मनीषा संजय शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कल्पना दिलीप जगताप (वय ४२, धंदा खासगी नोकरी, रा. बाबुर्डी, ता. बारामती), सूरज दिलीप जगताप (वय २३, धंदा शिक्षण, रा. बाबुर्डी), नीलेश दिलीप जगताप (वय २५, धंदा कपड्याचे दुकान, रा. बाबुर्डी, ता. बारामती), रोहिणी ऊर्फ रेणुका सुनील गोरे (रा. दुर्गा थिएटरजवळ, बारामती), दीपक जगताप (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही.) या चार जणांना याप्रकरणी अटक केली आहे. अटक आरोपी आणि दीपक जगताप, अंबादास पाडळे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही.), अंबादास पाडळे या दोघांसह अन्य दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी जगताप, पाडळे  फरारी आहेत. तू माझे ३ लाख रुपये व्याजाने घेतलेले आहेत, ते परत कधी करणार, आमचे फोन का घेत नाहीत, असे म्हणून संजय यास आरोपींनी शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन व्याजासह पैसे परत दे, नाही तर घरातून उचलून नेऊन पैसे वसूल करू, असा दम दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी मानसिक त्रास देत शिंदे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी महाराष्ट्र सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. आर. गंपले अधिक तपास करीत आहेत. ........बारामती शहरात सावकारी त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची गेल्या दोन महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. फेब्रुवारीत कसबा येथील शुभम बनकर या तरुणाने सावकारांच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केली होती. तसेच, सुपे येथील सावकाराविरोधात याच आठवड्यात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस