दगडाने ठेचून एकाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 21:45 IST2019-03-22T21:45:33+5:302019-03-22T21:45:52+5:30
पनवेल शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

दगडाने ठेचून एकाची हत्या
पनवेल - करंजाडेजवळ जेएनपीटीकडे जाणा:या पुलाखाली एका व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम पोलीस करीत आहेत.उरण जेएनपीटीकडे जाणाऱ्या पुलाखाली एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या व्यक्तीचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असून त्याची हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. पनवेल शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.